Israel-Iran War : इराणविरुद्ध इस्रायलला का मदत करत आहेत डोनाल्ड ट्रम्प? याचा अमेरिकेला काय फायदा? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America News Marathi: वॉशिंग्टन: सध्या इराण आणि इस्रायलमधील तणाव युद्धात परिवर्तित झाला आहे. इस्रायलने आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला इराणवर केला आहे. यामुले पसचिम आशियात अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणच्या अणुकार्यक्रमांविरोधात इस्रायलची कारवाई सुरु आहे. यामध्ये अमेरिकेचा देखील इस्रायलला पाठिंबा मिळत आहे. गेल्या अनेक काळापासून अमेरिकेने गाझातील हमासविरुद्धच्या युद्धात, तसेच इराणविरोधात साथ दिली आहे. पण यामागचे नेमकं कारण काय? यामाहचा नेमका हेतू काय आहे?
तर अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध फार जुने आहेत. २९४८ मद्ये अमेरिकेनेच स्वंतत्र्य ज्यू राष्ट्रा निर्माण करण्याचे आणि मतदीचे आश्वासन दिले होते. १९४८ मध्ये इस्रायलची स्थापन करण्यात आली होती. इस्रायलला राष्ट्र म्हमून मान्यता देणारा अमेरिका हा पहिला देश होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शवला होता. यामुले पश्चिम आशियात इस्रायलचे मोठे प्रभुत्व निर्माण झाले. यामुळेच अमेरिका इस्रायलचा घट्ट मित्र देश बनला.
शिवाय मध्यपूर्वेत तेलसंपत्ती, सुएझ कालवा, यांसारख्या अनेक रणनीतिक बाबी आहे. या गोष्टी अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळेच अमेरिका इस्रायलला मदत करत असून त्याचे वर्चस्व टिवकवून ठेवत आहे. इराणसारका मजबूत शत्रूला कमजोर करण्यासाठी अमेरिका इस्रायलसाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे.
तसेच इराणचे अण्वस्त्र कार्यक्रम अमेरिका आणि इस्रायल दोन्ही देशांना धोक्याचे वाटतात.यामुळे या प्रकल्पाला थांबवण्यासाठी इस्रायल अमेरिकेच्या दबावातून प्रयत्न करत होता. परंतु तरीही इराणने आपले अणु कार्यक्रम सुरुच ठेवले होते. यामुळेच इस्रायलने इराणवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यातूनच अमेरिका आपलील परराष्ट्र धोरणे राबवत आहेत. यातून आपला हितसंबंध साधत आहे. म्हणूनच अमेरिका कोणवरही असेच उपकार करत नाही, यामध्ये तो स्वत:चा फायदा बघतो आणि मगच इतर देशांना मदत करतो.