चीनमध्ये इस्रायली राजनयिकावर हल्ला, रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर!

इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान चीनकडून मोठी बातमी येत आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये इस्रायली राजनैतिक अधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

  इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान (Israel Hamas War) चीनकडून मोठी बातमी येत आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये एका इस्रायली राजनैतिकावर चाकूने प्राणघातक हल्ला (Israeli Diplomat Stabbed in China) करण्यात आला आहे. या इस्रायली राजनयिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बीजिंगमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  इस्रायली राजनयिकावर चाकू हल्ला

  चीनची राजधानी बीजिंगमध्ये इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे मात्र हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजनयिकाला लक्ष्य करून चाकूने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. सध्या राजनयिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिनी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  इस्रायल हमास युद्ध

  एकीकडे गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे, अशा परिस्थितीत चीनमध्ये इस्रायलच्या राजनैतिकावर झालेल्या हल्ल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. इस्रायलचे हवाई दल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील लोकांना गाझा सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे, तर हमासने लोकांना कुठेही जाण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. इस्रायल देखील सोशल मीडियावर हमासच्या क्रूरतेचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत आहे.

  इस्रायल-हमास युद्ध का सुरू झाले?

  गेल्या शनिवारी, म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी, हमासच्या दहशतवाद्यांनी गाझाची भिंत तोडून, ​​इस्रायलमध्ये घुसखोरी केली आणि 5000 रॉकेट डागले. लोकांवरही गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांना ओलीस ठेवण्यात आले. यानंतर इस्रायलने देशात आणीबाणी जाहीर केली असून सतत हल्ले करून हमासला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी सुमारे 4 हजार लोक मारले गेल्याची माहिती आहे. त्यात सातत्याने वाढ होत आहे.