गाझात इस्रायलची दहशतवादविरोधी मोहीम सुरुच ; आतापर्यंतच्या हल्ल्यात शेकडोंचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: इस्रायलने गाझात दहशतवाद्यांविरोधीत मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत इस्रायलने गाझामध्ये शुक्रवारी अनेक हल्ले केले आहेत. यामध्ये १०८ जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बहुतेक करुन महिला आणि लाहना मुलांचा समावेश आहे. अशी माहिती गाझातील अधिकाऱ्यांना दिली. तसेच इस्रायली सैन्याने गाझाच्या देइर अल-बलाहच्या बाहेरील भागांना आणि खान युनूस शहरांवरही हल्ला केला आहे.
दरम्यान शुक्रवारी (१६ मे) केलेल्या हल्ल्याच्या एक दिवस आधीच इस्रायलने गाझातील १५० ठिकाणांवर हल्ले केले होते. यामध्ये इस्रायलने दहशतवाद्यांची ॲंटी-टॅंक, लष्की तळे नष्ट केली आहेत. इस्रायलने हे हल्ले अशा वेळी केले आहेत, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यपूर्व देशांच्या दौऱ्यावर आहेत.
हा दौऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायला भेट दिलेली नाही. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरार पडल्या असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
दरम्यान इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसा, गाझातील दहशतवादविरोधी मोहीमत उत्तरी भागात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. इस्रायलच्या सैन्याची लष्करी कारवाई सुरुच आहे. इस्रायलच्या या मोहीमेचे उद्दिष्ट हमासच्या कैदैतून ओलिसींची सुटका करणे आणि हमासला सत्तेवरुन खाली उतरवणे आहे. यासाठी इस्रायल हमासवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
याच वेळी इस्रायलने येमेनेमधील हुथी दहशतवाद्यांविरोधातही कारवाई केले आहे. इस्रायलने हुथींना इशारा दिला आहे. तसेच येमेनमधील होदेइदा आणि सलिफ बंदरावरील हुथींच्या तळांवरही इस्रायलने हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी हुथींनी इस्रायलच्या राजधानी जेरुसेलम आणि इस्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बेन गुरियन विमानतळावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.
इस्रायलने हुथी विद्रोहींना धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हुथींनी इस्रायलवर हल्ले केल्यास त्यांचेही हाल हमाससारखे होती. हमासच्या नेत्यांचा खात्मा इस्रायलने केला असून हुथींच्या नेत्यांनाही गंभीर परिणाम भोगावे लागतील असे इस्रायलने म्हटले आहे.
दरम्यान मार्चमध्ये इस्रायलने हमाससोबच्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आणि गाझावर हल्ले सुरु केले. यामुळे पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ हुथींनी इस्रायलवर हल्ले केल्याचे म्हटले आहे. तसेच लाल समुद्रातील इस्रायलच्या बंदरांना देखील हुथींना लक्ष केले आहे.
सध्या इस्रायलची गाझातील आणि येमेनमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या कारवाईला सहमती दर्शवली आहे.