लंडनमध्ये आयोजित “राइज अँड रोल ऑफ इंडिया इन द वर्ल्ड” या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काश्मीर खोऱ्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
लंडन – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “राइज अँड रोल ऑफ इंडिया इन द वर्ल्ड” या लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि काश्मीरशी संबंधित विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत आता फक्त PoK परत मिळण्याची प्रतीक्षा करत आहे, जो पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावला आहे.
काश्मीरमधील महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रगती
परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत सरकारने काश्मीरच्या विकासासाठी आणि स्थैर्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. कलम 370 हटवणे, आर्थिक वाढीला चालना देणे, स्थानिक निवडणुका घेणे आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे ही त्यातील प्रमुख पावले आहेत. काश्मीरच्या विकासाबाबत बोलताना जयशंकर म्हणाले, “सरकारने बहुतेक समस्या सोडवण्यामध्ये प्रशंसनीय काम केले आहे आणि कलम 370 हटवणे हा यामधील मोठा निर्णय होता.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, काश्मीरमध्ये निवडणुका होणे आणि मोठ्या प्रमाणावर मतदान होणे हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मेरा इंतकाम देखेगी… 1200 च्या स्पीडने गाडी चालवत गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला आणि लावली आग
PoK परत मिळवणेच अंतिम उद्दिष्ट
पाकव्याप्त काश्मीरबद्दल परराष्ट्र मंत्र्यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “काश्मीरचा प्रश्न भारतात सामील होताच संपतो. काश्मीरचा संपूर्ण प्रश्न सोडवायचा असेल, तर PoK परत मिळवणे गरजेचे आहे.” त्यांच्या या वक्तव्यावरून भारत सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचा पुनरुच्चार झाला आहे. जयशंकर यांनी याआधी 9 मे 2024 रोजीही स्पष्ट केले होते की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो पुन्हा भारतात समाविष्ट करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष कटिबद्ध आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले होते की, 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर लोक PoK बाबत अधिक गंभीरपणे विचार करू लागले आहेत.
ते पुढे म्हणाले, “कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्याआधी विचारपूर्वक आणि धोरणात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. त्यामुळे भारत सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.”
Appreciated the conversation with @bronwenmaddox at @ChathamHouse this evening.
Spoke about changing geopolitics, geoeconomics, India-UK ties, neighbourhood and the Indian view of the world.
Do watch 🎥: https://t.co/Wp6CwLBtxY pic.twitter.com/0SSf1E7WuF
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 5, 2025
credit : social media
भारत-चीन संबंधांवर परराष्ट्र मंत्र्यांचे मत
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-चीन संबंधांवरही भाष्य केले. त्यांनी नमूद केले की, “भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या लोकसंख्येचा आकडा एक अब्जाहून अधिक आहे आणि त्यांचा इतिहासही प्राचीन आणि गुंतागुंतीचा आहे. आज दोन्ही देश वेगाने प्रगती करत आहेत आणि एकमेकांचे शेजारी आहेत.” या संबंधांच्या गुंतागुंतीबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, “जेव्हा एखादा देश वेगाने प्रगती करतो, तेव्हा त्याचे शेजारी आणि जागतिक संबंधांतील संतुलन बदलते. अशा स्थितीत भारत आणि चीन यांच्यात सहकार्य आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी स्वाभाविक आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : लंडनमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ल्याचा प्रयत्न; पाहा Video
भारताची PoK बाबत भूमिका स्पष्ट
परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यांमुळे भारताची PoK बाबतची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. सरकार यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही आणि योग्य वेळी योग्य पावले उचलली जातील, असे संकेत त्यांनी दिले. भारत सरकारने गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये स्थैर्य आणि विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे हा प्रश्न अधिक सुटसुटीत होत आहे. भारताच्या सामरिक धोरणात PoK हा एक महत्त्वाचा मुद्दा असून, भविष्यात भारत सरकार या दिशेने कोणते निर्णय घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.