नोकरीच्या नावाखाली माानवी तस्करीचं जाळं उघड; म्यानमारमधून १२५ भारतीयांची सुटका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मैत्री पुन्हा ट्रॅकवर…! Trump च्या ‘या’ व्यक्तव्यानंतर Musk ने मानले आभार, म्हणाले…
थालंडमधील (Thailand) भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या नऊ महिन्यात नोकरीच्या घोटाळ्याच्या प्रकरणाअंतर्गत १,५०० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. रिक्रूटर एजंट्सच्या नोकरी भरतीच्या अमिषाला हे लोक बळी पडले होते. पण सध्या त्यांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे मानवी तस्करीचं मोठं जाळं देखील उघड पडलं आहे. थायलंडमधील भारतीय दूतावासाने या नागरिकांना बॅंकॉकमार्गे माय सोट येथून मायदेशी पाठवले. सोशल मीडियावर एक्सवरुन याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय दूतावासाने नागरिकांना सावधतेचाही इशारा दिला आहे. भारतीय दूतावासाने सांगितले आहे की, कोणत्या खोट्या, किंवा एजंट्सद्वारे मिळणाऱ्या नोकरीच्या भरतीला बळी पडू नका केवळ अधिकृत संकेतस्थळांवर विश्वास ठेवा. परदेशात नोकरीची ऑफर स्वीकरण्यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांचे ओळखपत्र वैगेरे तपासा. एजंट्सचे रेकॉर्ड तपासून घ्या. यशिवाय थायलंडमध्ये भारतीयांना व्हिसा-फ्री प्रेवश मिळतो. केवळ पर्यटनासाठी आणि लहान व्यावसायासाठी असून त्याचा गैरवापर न करण्याचा इशारा देखील दूतावासाने दिला आहे.
Today, 125 Indian nationals, released from scam-centres in Myawaddy in Myanmar, were repatriated from Mae Sot in Thailand by a special flight operated by the Indian Air Force. With this, total 1500 Indians released from scam centres in Myanmar have been repatriated through… pic.twitter.com/6JlkFrog0Z — India in Thailand (@IndiainThailand) November 19, 2025
यापूर्वी भारताने ६ नोव्हेंबर रोजी थायलंडमधून २७० नागरिकांना परत आणले होते. लष्करी विमानातून या लोकांना भारतात आणण्यात आले होचे. या व्यक्ती देखील म्यानमारमधील एका नोकरी घोटाळा केंद्राच्या जाळ्यात अडकले. होते. थायलंडमधील पोलिसांना या केंद्रावर छापा मारला होता, परंतु तेथील लोक पळून गेले होते. याशिवाय ऑक्टोबरमध्ये देखीस म्यावाडी येथे केके पार्कच्या सायबर क्राइम हबवर छापा टाकण्यात आला होता. यावेळी देखील अंदाजे ५०० भारतीय या जाळ्यात अडकले होते.
आरोपीला झाली पळता भूई थोडी! कॅनडात जाण्यापूर्वी मुसक्या आवळून आणणार भारतात
Ans: भारताने म्यानमारमध्ये अडकलेल्या १२५ भारतीय नागरिकांची सुटका केली आहे.
Ans: भारतीय नागरिकांना परदेशात नोकरीचे आणि उच्च पगारचे आमिष दखवण्यात आले होते. याला हे नागरिक बळी पडले आणि म्यानमारमध्ये अडकले.
Ans: थायलंडमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना सावधतेचाही इशारा दिला आहे. परदेशात नोकरीची ऑफर स्वीकरण्यापूर्वी, भरती एजंट्सवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांच्या ओळपत्रांची आणि बॅकग्राऊंडची तपासणी करण्याचा इशारा दिला आहे.






