Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना
निसान मॅग्नाइटमध्ये अनेक दमदार फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला होईल. यामध्ये की-लेस एंट्री, एलईडी टेल लँप, 16 इंच अलॉय व्हील्स, रूफ रेल, एलईडी टर्न इंडीकेटर, 17.78 सेमी कंट्रोल स्क्रीन, क्रूज कंट्रोल, एंबिएंट लाइट, अँड्राइड ऑटो, अॅपल कार प्ले, पीएम 2.5 फिल्टर, आठ इंच इंफोटेनमेंट सिस्टम, ऑटो डिमिंग आईआरवीएम सारख्या फीचर्सचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तर वाहन निर्माता किआने सादर केलेल्या सिरोस एसयूव्हीमध्ये देखील कंपनीने जबरदस्त फीचर्स ऑफर केले आहेत. यामध्ये 30 इंच ट्रिनिटी पेनोरमिक डिस्प्ले पॅनल दिला आहे. ज्यामध्ये कनेक्टेड कार नेविगेशन सिस्टिम, ड्यूल पेन सनरूफ, 64 रंगांचे एंबिएंट लाइट्स, रियर सीट रिक्लाइन, स्लाइड आणि वेंटिलेटिड सारख्या अनेक फीचर्सचा समावेश आहे.
निसानने मॅग्नाइट एसयूवीमध्ये एक लीटर नेुचरल एस्पिरेटिड आणि टर्बो इंजिन दिले आहे, ज्यामुळे 72 आणि 100 पीएस पावर मिळते. यासोबतच 96 आणि 160 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतात. तसेच या एसयूव्हीमध्ये 5 स्पीड मॅनुअल, 5 स्पीड एएमटी आणि सीवीटी ट्रांसमिशनचे पर्याय देण्यात आले आहेत. तर किआ सिरोसमध्ये कंपनी दोन इंजिन पर्याय ऑफर करते. यामध्ये एक लीटरची क्षमता असलेले टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाते, ज्यामुळे 120 पीएसची पावर आणि 172 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण होतो. याशिवाय, यामध्ये 1.5 लीटरची क्षमता असलेले डिझेल इंजिन देखील ऑफर केले जाते, ज्यामुळे116 पीएसची पावर आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण होतो. दोन्ही गाड्यांमध्ये मॅनुअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.
Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क
निसानने सादर केलेल्या मॅग्नाइट एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 5.65 लाख रुपये आहे. तर या गाडीच्या टॉप व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत 10.96 लाख रुपये आहे. तर, किआ सिरोसची एक्स शोरूम किंमत 8.40 लाख रुपये आहे. तर या गाडीच्या टॉप व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत 15.80 लाख रुपये आहे.






