India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली 'ही' अट (फोटो सौजन्य: एआय)
१९९६ मध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये गंगा नदीच्या पाणी वाटापावरुन ३० वर्षांचा करार करण्यात आला होता. या नदीला बांगलादेशात पद्मा नदी म्हणून ओळखले जाते.बांगलादेशच्या एकूण लोकसंख्यापैकी एक तृतीयांश जनता उपजीविकेसाठी, मासेमारीसाठी आणि शेतीसाठी पद्मा नदीवर अवबंलून आहेत.
भारताने १९७५ या नदीवर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात ‘फराक्का बॅरेज’ नावाचा मोठा बांध उभारला आहे. यामुळे उन्हाळ्यात बांगलादेशात पाण्याचा प्रवाह कमी होतो. याबांधामुळे नद्या कोरड्या पडत आहेत. तसेच किनारपट्टीच्या भागात खाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने बांगलादेशाच्या शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे. यावरुन दोन्ही देशांत वाद सुरु झाला आहे.
बांगलादेशने तीस्ता पाणी वाटप करारावरुनही आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या या वादावर भारताचे परराष्ट्र मंत्रालय अत्यंत संतुलित भूमिका घेत आहे. रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांमध्ये ५४ नद्या असून अशा पाणी वादांवर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांकडे द्विपक्षीय संयुक्त नदी आयोग असून याअंतर्गतच चर्चा व्हावी. सध्या भारत यावर काय मार्ग काढेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






