ट्रम्प यांची जी हूजुरी अंगाशी! पाकिस्तानचे PM शाहबाज विरोधात देशात संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या वर्षी पाकिस्तान (Pakistan) सरकारने मुत्सद्देगिरीच्या नावाखाली डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन केले होते. या निर्णयाचा पाकिस्तान सरकारविरोधात देशातील विरोध पक्ष, धार्मिक संघटना आणि नागरी समाज संतापला होता. शिवाय इराणमध्ये शाळेवर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात १६३ चिमुरड्यांचा बळी गेला होता. यामुळे अशा व्यक्तीला शांती दूत म्हणणे हा मोठा गुन्हा असल्याचे शाहबाज सरकारच्या विरोधाकांनी म्हटले.
पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी तीव्र निदर्शने सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर उतरले असून यामध्ये अमेरिका-इस्रायलचा तीव्र निषेध केला जात आहे. शाहबाज शरीफ यांच्यावरील तीव्र रोष व्यक्त केला जात असून शाहबाज शरीफ यांना देशाची माफी मागण्यास सांगितले जात आहे. देशाची जाहीर माफी मागावी अशा मागणी सोशल मीडियावर विरोधकांनी केली आहे.
गेल्या वर्षी २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये ४ दिवस तीव्र संघर्ष झाला होता. लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानी नेत्यांनी ट्रम्प यांची जी हूजुरी सुरु केली होती. युद्धविरोमाचे श्रेयही त्यांना दिले होते. अगदी अमेरिकेत त्यांचीही भेटही घेतली होती. शिवाय बलुचिस्तानमध्ये मिळालेल्या खाणीतील खनिजांचे लालचही दिले होते. आता इराणमधील हल्ल्यानंतर शरीफ आणि मुनीरसाठी ही जवळीक घातक ठरत आहे.
शिवाय पाकिस्तान सरकारने या मुद्यावर मौन साधले आहे. याच वेळी दुसरीकडे मध्यपूर्वेतील युद्धामुळे पाकिस्तानमध्ये तेलाचा पुरवठाही कमी झाला आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींनी उच्चांक गाठल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असून शहबाज शरीफ सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
Pakistanis question PM Shehbaz Sharif: How dare he nominate Trump for Nobel Peace Prize? They demands apology & Pakistan’s withdrawal from peace board. pic.twitter.com/Tq1uUPtsA5 — Ravinder Singh Robin (@rsrobin1) March 10, 2026
Ans: इराणवरील हल्ल्यांनंतर आणि ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दिल्यामुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. देशातील विरोधी पक्ष आणि नागरिक शहबाज यांच्यावर टीका करत आहेत आणि त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत आहेत.
Ans: पाकिस्तानमधील सरकारच्यै विरोधकांच्या मते इराणवरीव हल्ल्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ट्रम्प यांना शांततेचा पुरस्कार देण्याची शिफारस योग्य नाही असे म्हणत पाकिस्तान सरकारवर टीका केली जात आहे.






