युक्रेनबाबत काय योजना आहे? पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना विचारले, नाटो प्रमुखांनी मोठा दावा केला: 'भारतावरील शुल्क रशियाला मोठा धक्का देईल.' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांच्याकडे थेट युक्रेनबाबतची रणनीती विचारली.
नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांचा दावा ट्रम्पच्या शुल्कामुळे रशियावर मोठा परिणाम.
भारतावरचा करभार वाढला असला तरी अमेरिका-भारत संवादाचे नवे मार्ग खुले झाले.
Modi questions Putin Ukraine : नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन दरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेला तणाव आता एका नव्या वळणावर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर (India) लादलेला ५० टक्क्यांचा कर, भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का ठरला आहे. मात्र याचा परिणाम फक्त भारतापुरताच मर्यादित न राहता थेट रशियावर होत असल्याचा दावा नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी केला आहे.
या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी संवाद साधला. मोदींनी युक्रेनवरील रशियाची पुढील रणनीती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतावर कराचा भार वाढल्यामुळे नवी दिल्ली आता रशियाशी अधिक थेट आणि खुलेपणाने चर्चा करत असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, फोन कॉलद्वारे मोदी आणि पुतिन यांच्यात सतत संवाद सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-SICA ties : भारत आणि मध्य अमेरिका एकत्र; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे नवे सहकार्य मॉडेल जगासमोर
मार्क रुटे यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत म्हटले की “ट्रम्प यांनी भारतावर घातलेले कर केवळ दिल्लीवरच नाही तर मॉस्कोवरही मोठा परिणाम घडवत आहेत. भारताचा रशियासोबतचा तेल व्यापार आणि इतर आर्थिक देवाणघेवाण या करांमुळे दबावाखाली आली आहे.” रुटे यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“Trump’s tariffs on India are having a big impact on Russia. Delhi is on the phone with Putin and Narendra Modi is asking him to explain his strategy on Ukraine because India is being hit with tariffs,” says NATO Secretary-General Mark Rutte pic.twitter.com/ON44ej6jZ7 — Shashank Mattoo (@MattooShashank) September 26, 2025
credit : social media
या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे रशियाकडून भारताची मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी.
युक्रेन युद्धानंतर पश्चिमी जगाने रशियावर कडक निर्बंध घातले, मात्र भारताने स्वस्त दरात रशियन तेल खरेदी सुरू ठेवली. यामुळे अमेरिकेचे संताप वाढले. ट्रम्प यांनी वारंवार आपली नाराजी जाहीर केली आणि शेवटी भारतावर अतिरिक्त २५ टक्के करही लादला. एवढेच नव्हे तर व्हिसा निर्बंध कडक करून भारतीय विद्यार्थ्यांना आणि कामगारांना अडचणीत आणले.
तथापि, सर्व तणावाच्या वातावरणातही एक आशेची किरण दिसत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अमेरिकेच्या अलीकडील भेटीत महत्त्वपूर्ण हालचाली झाल्या. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेऊन व्यापार करार आणि शुल्क आकारणीसंबंधी चर्चा केली.
या बैठकीनंतर नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन दोन्हीकडून आशावादी संकेत मिळत आहेत.
भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. “राष्ट्रीय हित सर्वांत महत्त्वाचे.” भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली कारण त्याचा थेट फायदा देशातील ग्राहकांना आणि अर्थव्यवस्थेला झाला. दुसरीकडे, अमेरिका आणि पश्चिमी जगाशीही व्यापार व सुरक्षा संबंध मजबूत ठेवणे भारतासाठी तितकेच आवश्यक आहे. हाच तो ‘राजनैतिक संतुलनाचा खेळ’ आहे ज्यात भारत यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे.
रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी भारत हा सर्वात मोठा खरेदीदार आहे. विशेषतः तेल आणि संरक्षणसामग्रीच्या व्यवहारामुळे मॉस्कोला भारताची गरज आहे. त्यामुळे मोदी आणि पुतिन यांच्यातील संवाद केवळ सौजन्याचा नाही तर जागतिक धोरणात्मक गरजेचा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America News : 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊनची शक्यता; ट्रम्प यांच्या गुंतवणुकीच्या दाव्यानंतर नवा राजकीय कलह
या घडामोडी केवळ तीन देशांपुरत्याच मर्यादित नाहीत.
एकीकडे नाटो रशियावर आर्थिक आणि लष्करी दबाव वाढवतो आहे.
दुसरीकडे अमेरिका व्यापाराच्या माध्यमातून भारतावर पकड ठेवू इच्छितो.
आणि तिसरीकडे भारत स्वतःचे स्वातंत्र्य जपून दोन्ही बाजूंना तोंड देण्याचा प्रयत्न करतो आहे.
यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू आता फक्त वॉशिंग्टन किंवा मॉस्को नाही, तर नवी दिल्ली देखील आहे.
ट्रम्प यांची भूमिका अजूनही कडक आहे. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी कमी केली नाही तर शुल्कात आणखी वाढ होऊ शकते. मात्र जयशंकर यांच्या भेटीमुळे संवादाचा मार्ग खुला झाला आहे. आता मोदी-पुतिन चर्चेच्या पुढील टप्प्यांवर आणि भारत-अमेरिका चर्चेच्या निकालावर जगाचे डोळे खिळले आहेत.