Mojtaba Khamenei : पर्वतांत लपले की मॉस्कोत पोहोचले? अमेरिकेने मोज्तबा खामेनींचा घेतला धसका; जागतिक स्तरावर तणावाची चर्चा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Mojtaba Khamenei Missing News : मध्यपूर्वेतील राजकारण (US-Israel Iran War) आता एका अत्यंत रहस्यमयी वळणावर येऊन ठेपले आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त झालेले मोज्तबा खामेनी (Mojtaba Khamenei) गेल्या १० दिवसांपासून जगाच्या नजरेतून गायब आहेत. ८ मार्च रोजी त्यांच्या नियुक्तीची बातमी समोर आल्यापासून ते एकदाही सार्वजनिक रित्या दिसलेले नाहीत. अमेरिकेच्या सर्वात प्रगत गुप्तचर यंत्रणा (CIA) आणि इस्रायलची ‘मोसाद’ (Mossad) मोज्तबा यांचा शोध घेण्यासाठी आकाश-पाताळ एक करत आहेत, मात्र अद्याप त्यांच्या हाती केवळ रिकामे दावे आणि अफवाच लागल्या आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोज्तबा यांच्याबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणचे नवे नेते कदाचित आता हयात नाहीत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, इराणने हा दावा तात्काळ फेटाळून लावला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, खामेनी पूर्णपणे सुरक्षित असून ते एका गुप्त ठिकाणाहून देशाचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. मात्र, जर ते सुरक्षित असतील, तर ते कॅमेऱ्यासमोर का येत नाहीत? हा प्रश्न आता जागतिक समुदायाला सतावत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WorldWar3: इराणच्या भविष्यात काळोख! इस्रायल करत आहे इराणच्या पुढच्या पिढ्याही नष्ट करणारे हल्ले; माती आणि पाणी बनवले विषारी
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) दावा केला आहे की, ९ मार्च रोजी झालेल्या एका भीषण हल्ल्यात मोज्तबा खामेनी गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अमेरिकन लष्करी कमांड ‘सेंटकॉम’ने (CENTCOM) मोज्तबा यांना आपल्या हिटलिस्टमध्ये समाविष्ट केले असून, त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती देणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकेचे उद्दिष्ट स्पष्ट आहे – वरिष्ठ खामेनींनंतर आता मोज्तबा यांनाही सत्तेवरून किंवा जगातून हटवणे.
Iranian Journalist Yusef Jalali weighs in on what is known about claims that Iran’s new Supreme Leader Mojtaba Khamenei may have been injured during recent US-Israeli strikes.#Iran #US #Khamenei @Leighanngerrans pic.twitter.com/0FGVRlfvVh — Al Arabiya English (@AlArabiya_Eng) March 14, 2026
credit – social media and Twitter
मोज्तबा खामेनींना शोधणे अमेरिकेसाठी कठीण जाण्याची दोन प्रमुख कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत: १. मर्यादित माहिती: वरिष्ठ खामेनींच्या तुलनेत मोज्तबा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल अमेरिकेला फारच कमी माहिती आहे. ते नेहमीच पडद्यामागून सूत्रे हलवण्यात माहीर राहिले आहेत. २. रशियाचा हात: कुवेती मीडियानुसार, मोज्तबा यांना इराणमध्ये ठेवणे सुरक्षित नसल्याने रशियाने त्यांना लष्करी विमानाने मॉस्कोला नेले आहे. तिथे एका लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समजते. रशिया आणि इराणचे घनिष्ट संबंध पाहता, व्लादिमीर पुतिन यांनी मोज्तबा यांना ‘संरक्षण’ दिले असण्याची शक्यता दाट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : USCIRF: ‘RAW’ वर बंदी आणि ‘RSS’ चा व्हिसा रद्द! अमेरिकेच्या ‘या’ वादग्रस्त मागणीमागे नेमकं कुणाचं डोकं? भारत शत्रूंच्या यादीत
जर मोज्तबा खामेनी खरोखरच रशियात असतील, तर अमेरिका आणि रशियामधील तणाव आणखी वाढू शकतो. इराणच्या सत्तेचा हा नवा वारसदार पुन्हा कधी समोर येतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इराण काय पावले उचलतो, यावर तिसऱ्या महायुद्धाचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या तरी, मोज्तबा खामेनी हे जगासाठी एक न उलगडणारे कोडे बनले आहेत.
Ans: ६ मार्च रोजी त्यांची नियुक्ती झाली आणि ८ मार्च २०२६ रोजी ही माहिती अधिकृतपणे समोर आली.
Ans: कुवेती वृत्तपत्र 'अल-जरिदा'ने दिलेल्या वृत्तानुसार, मोज्तबा यांना रशियन लष्करी विमानाने मॉस्कोला उपचारासाठी नेण्यात आले आहे.
Ans: मोज्तबा हे इराणचे नवे सर्वोच्च नेते असून अमेरिकन हितसंबंधांना त्यांच्याकडून मोठा धोका असल्याचे मानले जात आहे, त्यामुळे त्यांच्या शोधासाठी बक्षीस जाहीर केले आहे.






