Iran Military Power : इराणचे शक्तीप्रदर्शन! अमेरिकेचे दावे फोल? ३० मिसाइल साइट्स अजूनही 'ॲक्टिव्ह' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एका स्रीकेट असेंसमेंटनुसार, इराणच्या ताफ्यातील ३३ पैकी ३० मिसाइल साइट्स अजूनही ॲक्टिव्ह आहेत. अमेरिकेच्या भीषण हल्ल्यानंतरही इराणने आपली सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी पायाभूत सुविधा टिकवून ठेवली आहे.
अहवालानुसार, इराणच्या बहुतांश मिसाइवल साइट्स स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या अगदी जवळ आहेत. या भागातून २० टक्के तेल पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केला जातो. मात्र या मार्गावर अमेरिकन युद्धानौका आणि इराणच्या नाकेबंदीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. या भागात गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार हल्ले सुरु होते.
मात्र, या हल्ल्यांनतरही इराण (Iran) आपल्या ७०% मोबाईल मिसाइल्स लॉन्चर्स, आणि दारुगोळा सुरक्षित ठेवण्यात यशस्वी झाला आहे. यामध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. अहवालानुसार, इराणची ९०% भूमिगत क्षेपणास्त्र केंद्रेही सुरिक्षत आहेत.
ट्रम्प यांनी युद्धादरम्यान इराणच्या लष्कराबाबात आणि नौदलाबाबत अत्यंत मोठे आणि आक्रमक दावे केले होते. इराणच्या नौदलाची जहाजे समुद्रात बुडाली असून त्यांची ताकद पूर्णपणे नष्ट झाली आहे. होर्मुझमध्येही ५० हून अधिक जहाजांना माघारी पाठवण्यात आले असून तेल टँकरही रोखले आङेत. याशिवाय इराणची लष्करी, हवाई यंत्रणा आणि हवाई संरक्षण सिस्टमही नष्ट झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र अहवालानुसार, इराणची लष्करी क्षमता अद्यापही सक्रिय आहे.
अहवालात अमेरिकेच्या लष्करी क्षमतेबाबतही सांगण्यात आले आहे. यानुसार, अमेरिकेने १,१०० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्र, १,३०० हून अधिक पॅट्रियट इंटरसेप्टर्सचा वापर केला आहे. यामुळे अमेरिकेचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो पुन्हा भरुन काढण्यासाठी अनेक वर्षे जातील. ज्याचा थेट परिणाम युक्रेन(Ukraine) ला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यावर होऊ शकतो.
एकीकडे इराण आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प यांनी मात्र हा अहवाला फेटाळला आहे. इराणने पुन्हा मोठ्या लष्करी ताकदीने उभा राहू शकणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र ट्रम्प यांचे दावे आणि अहवाल पाहता यामध्ये मोठी तफावत दिसत आहे. सध्या दोन्ही देशांमधील युद्ध पुन्हा सुरु होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.






