'निमिषाला तात्काळ फाशीवर लटकवा' ; तलालच्या कुटुंबाकडून भारतीय धर्मगुरूंच्या मध्यस्थीला नकार, मृत्युदंडाच्या मागणीवर ठाम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
येमेनमध्ये निमिषा प्रिया हिने येमेनी व्यापारी तलाल अब्दो महदी याची हत्या केली होती. या प्रकरणी निमिषा गेल्या आठ वर्षांपासून येमेनच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २०१८ मध्ये तिला महदीच्या खूनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. नंतर २०२० मध्ये येमेनच्या न्यायालयाने तिला मृत्यूंदडाची शिक्षा सुनावली. तिच्या बचावासाठी भारतीय धर्मगुरु ए. पी अबुबकर मुसलियार यांनी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांच्या मध्यस्थीला पीडिताच्या कुटुंबाने नकार दिला आहे.
Israel Attack On Gaza : इस्रायलच्या गाझातील कारवाया सुरुच; हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार
यापूर्वी काही काळासाठी निमिषाची फाशी स्थगित करण्यात आली होती. परंतु तलाल महदीच्या भावाने अब्दुल फत्ताह महदीने तिच्या फाशीची मागणी केली. तलाल महदीच्या कुटंबाने निमिषा प्रियाला तात्काळ फाशी देण्याची मागणी पुन्हा एकदा मांडली आहे. महदीच्या भावाने अब्दुल फत्ताह यांनी म्हटले की, निमिषाला वाचवण्याचा धर्मगुरुंचा प्रयत्न केवळ कर्तव्याच्या भावनेने प्रेरित आहे.
या संदर्भात म्हटले की, “शासकीय कार्यालय, तसेच कंठापुरम आणि हबीब उमर बिन हाफिज यांच्या कुटुंबाला भेटण्याचा किंवा कोणताही संपर्क साधण्याची आमची इच्छा नाही. तसेच अब्दुलने म्हटले आहे की, निमिषाने माझ्या भावाचा खून केला आहे, याची तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. तसेच धर्मगुरुंनी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे आणि तथ्यांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करु नये.”
तलाल महदीचे कुटुंब मृत्यूदंडाच्या मागणीवर ठाम
अब्दुलने पुढे म्हटले की, “हा आमचा हक्क आहे आणि आमचे रक्त आहे. आम्ही कोणालाही घाबरत नाही.” त्याने निमिषावर कुटुंबाचा नऊ वर्षे छळ केल्याचा आरोप करत तिच्या मृत्यूदंडाची मागणी केली आहे. तसेच काही लोकांनी याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला असल्याचा आरोप महदीच्या भावाने केला आहे. त्याने म्हटले की, आमच्या रक्ताचा विजय होईपरयंत आम्ही झुकणार नाही.
तसेच अब्दुल फत्ताह महदीने त्याच्या भावाच्या मृत्यूबद्दल बोलताना म्हटले की, माझ्या भावची हत्या करण्यात आली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.त्याला आणि त्याच्या कुटुंबाला झालेल्या वेदनांसाठी न्याय मिळालाच पाहिजे असे त्याने म्हटले आहे. यामुळे आकाश कोसळले तरी मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्यात येणार नाही.
वॉशिंग्टनमध्ये बेघरांना नाही थारा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘व्हा बाहेर’चा नारा






