गाझामध्ये नरसंहार सुरुच! दर तासाला एका मुलाचा उपासमारीने बळी ; UN चा धक्कादायक अहवाल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Gaza War News Marathi : इस्रायल आणि हमास युद्धाने गाझाला हादरवून टाकले आहे. दिवसेंदिवस गाझा पट्टीतील परिस्थिती भीषण होत चालली आहे. गाझामध्ये युद्धामुळे आणि इस्रायलच्या कारवायांमुळे अनेक लोकांना संघर्षाचे जीवन जगावे लागत आहे. तसेच गाझातील मानवतावादी मदतही न पोहोचल्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा उपासमारीमुळे बळी गेला आहे. यामध्ये विशेष करुन मुलांचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रासंघाच्या (UN)आणि UNICEF च्या अहलावालनुसार, गाझामध्ये दररोज किमान २८ मुलांचा उपासमारीमुळे बळी जात आहे. गाझातील लोकांना पायाभूत सुविधा, अन्न, पाणी, औषधे, आरोग्य सुविधा आणि निवार मिळणे देखील कठीण झाले आहे. गाझातील मानवयी आपत्ती कडेलोटावर आली आहे. इस्रायल आणि हमास युद्धाने अनेकांचा बळी घेतला आहे.
ट्रम्पच्या ऑफरला ब्राझीलच्या अध्यक्षांकडून केराची टोपली; म्हणाले, ‘मी आधी पंतप्रधान मोदींशी…’
संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे १८ हजार पेक्षा जास्त मुले मृत्यूमुखी पडली आहेत. दर तासाला एका मुलाचा उपासमार आणि तहानेने मृत्यू होत आहे. ६० हजाराहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहे. मार्च २०२५ मध्ये इस्रायलने गाझा पट्टीतील सर्व सीमा बंद केल्या होता. यामुळे गाझातील लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला.
Death by bombardments.
Death by malnutrition and starvation.
Death by lack of aid and vital services.
In Gaza, an average of 28 children a day – the size of a classroom – have been killed.Gaza’s children need food, water, medicine and protection. More than anything, they need a… pic.twitter.com/7QIQQ6IAoG
— UNICEF (@UNICEF) August 4, 2025
शिवाय अनेक वेळा अन्न वाटपादरम्यान इस्रायली सैन्याने लोकांवर गोळीबार केला. या गोळीबारातही शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. सध्या गाझामध्ये ५ लाख लोक भूकमारीने त्रस्त असल्याचे UN च्या अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, गाझाची लोकसंख्या सुमारे २३ लाख आहे. यातील बहुतेक लोकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवा देखील उपल्बध नाहीत. गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचत आहे खरी परंतु, याची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
गाझामध्ये अशुद्ध पाण्यामुळे डायरिया, पिवळी काविळ यांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. गाझातील आरोग्यव्यवस्था अत्यंत बिकट झाले आहे. अनेक रुग्णालये बंद पडले आहे, तर काही रुग्णालयांमध्ये पुरेश्या सेवाही उपलब्ध नाहीत. वैद्यकीय कर्मचारी देखील मृत्यूमुखी पडले आहे. रफाह शहरामध्ये उभारलेले फील्ड हॉस्पिटलही सेवांच्या अभावामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे.
इस्रायल आणि हमास युद्धाने गाझातील ९०% लोकसंख्या बेघर झाली आहे. अनेक लोक उघड्यांवर राहत आहे. गाझातील ९५% शाळा उद्धव्सत झाल्या आहेत. यामुळे गाझातील मुलांचे शिक्षणही पूर्णत: थांबले आहे. यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न उद्भवला आहे. सध्या संयुक्त राष्ट्राने रेडक्रॉस आणि आंतरराष्ट्रीय संस्थाकडे गाझामध्ये युद्धबंदीची मागणी केली आहे. शिवाय एमनेस्टी इंटरनॅशनलने इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला आहे.
चीनकडून भारताला खास आमंत्रण; पंतप्रधान मोदी हेवे-दावे विसरुन करणार का दोस्ती?