'भारताचा POK वर बेकायदेशीर कब्जा' ; असीम मुनीर यांनी काश्मीर मुद्द्यावर पुन्हा विष ओकले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी विधान केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारताला धमकवत दावा केला आहे की, भारताने कोणत्याही चिथावणीशिवाय पाकिस्तानवर हल्ला केला होते. या घटनेला त्यांनी रणनीतिक दूरदृष्टीचा अभाव म्हणून संबोधले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहे. असीम मुनीर यांनी वाढत्या प्रादेशिक तणावासाठी भारताला जबाबदार धरले आहे.
शनिवारी २८ जून रोजी असीम मुनीर यांनी कराचीतील पाकिस्तान नौदलाला भेट दिली. यावेळी नौदल अकादमीमध्ये बोलताना त्यांनी भारविरोधी विधान केले. त्यांनी भारताला अस्थिरता निर्माण करणारा आणि पाकिस्तानला शांत देश म्हणून वर्णने केले. त्यांनी म्हटले की, भारत जाणीपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या पाकिस्तानात एकही दहशतवादी नाही. पाकिस्तान दहशतवादाच्या समाप्तीच्या जवळ आहे. तसेच भविष्यात भारताने कोणताही हल्ला केला तर त्याला पाकिस्तान निर्णायक उत्तर देईल असेही असीम मुनीर यांनी म्हटले.
🚨 Breaking 🇵🇰🪖:
📍Pakistan Army Chief Asim Munir once again takes a hardline stance on Kashmir, openly glorifying slain terrorists by using veiled diplomatic language.
📍In a speech laced with doublespeak, he reaffirmed Pakistan’s unwavering support for terrorism in the… pic.twitter.com/NQ1YF2HvXj
— OsintTV 📺 (@OsintTV) June 28, 2025
याशिवाय असीम मुनीर यांनी आपल्या भाषणात काश्मीरचाही मुद्दा पुन्हा उपस्थित केली. त्यांनी म्हटले की, आपल्या काश्मीर बांधवांच्या बलिदानाचे स्मरण केले पाहिजे. भारताने काश्मीरवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. याविरोधात आपले काश्मीर बांधव गेल्या अनेक काळापासून लढत आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान काश्मीर प्रश्नाच्या न्याय्य तोडगा काढण्यासाठी त्यांच्या बांधवांसोबत खंबीरपणे उबा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरांवानुसार आणि काश्मीर लोकांच्या आशांशी सुसंगत आहेत.
यापूर्वी असीम मुनीर यांनी एप्रिल २०२५ मघ्ये काश्मीरला पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यांनी हिंदीमध्ये म्हटले होते की, “कश्मीर हमारी गले की नस है… ये हमारी गले की नस ही रहेगी, हम इसे नहीं भूलेंगे.”
त्यांच्या या विधानानंनतरच भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ निरापराध लोकांचा बळी गेला. याच्या प्रत्युत्तरात भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला. तसेच ऑपरेशष सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डेही उद्ध्वस्त केले.