Rohit Sharma (Photo Credit- X)
Yograj Singh on Rohit Sharma: भारताला टी२० आणि चॅम्पियन्स ट्रॅाफी जिंकून देणारा टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता फक्त वनडे सामन्यात खेळतान दिसणार आहे. पण त्याच्या खेळण्यावरही आता काही जण प्रश्न निर्माण करत आहे, कारण त्याचं वाढत वय. रोहित शर्मा आता ३८ वयाचा आहे आणि फिटनेसवर अजूनही टीका करत आहे. पण आता युवराज सिंहचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) यांनी रोहित शर्माचा बाजू घेत टीकाकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी रोहितला त्याच्या फिटनेसवर काम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की जर रोहितला दररोज १० किलोमीटर धावायला लावले तरच त्याची फिटनेस सुधारेल.
माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्माला वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या प्रश्नावर जोरदार पाठिंबा दिला. ते म्हणाले, “रोहितमध्ये अजून खूप क्रिकेट बाकी आहे.” अनेक लोक रोहितबद्दल निरर्थक गोष्टी बोलतात, पण तो सर्वात जबाबदार खेळाडू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सर्वांनी त्याचे उत्तम उदाहरण पाहिले आहे. ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली, ती त्याची क्लास दाखवून देते.”
Do you guys agree with Yograj Singh?#RohitSharma #YograjSingh #Cricket #TeamIndia pic.twitter.com/Ci6RtcVTEK
— OneCricket (@OneCricketApp) August 16, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने ८३ चेंडूत ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. या खेळीमुळे भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळाले आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कारही मिळाला होता. योगराज यांनी दावा केला की ही खेळी ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितच्या अतुलनीय क्षमतेचा पुरावा आहे.
योगराज सिंह यांनी रोहितला फिटनेसवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “रोहित, आपल्याला अजून ५ वर्षांसाठी तुझी गरज आहे, त्यामुळे आपल्या फिटनेसवर काम कर. चार लोक कामाला लाव आणि दररोज सकाळी १० किलोमीटर धाव.” त्यांनी असेही सांगितले की जर रोहितने ठरवले, तर तो ४५ वर्षांपर्यंत याच क्लाससोबत खेळू शकतो. योगराज सिंह यांनी रोहितला स्थानिक (डोमेस्टिक) क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला. “जितका जास्त खेळाल, तितके जास्त फिट राहाल,” असे ते म्हणाले.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. लवकरच ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे.