पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला न केल्याचा दावा केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. 9 दहशतवादी तळांवर हल्ला करुन भारताने 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र यामध्ये भारताकडून एकही पाकिस्तानी नागरिक किंवा सैनिक मारण्यात आला नाही. मात्र पाकिस्तानने आपल्या नापाक हालचाली थांबवल्या नाहीत. पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यामध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारताने पाकिस्तानची झोप उडवली. मात्र पाकिस्तानने हल्ला न केल्याचे म्हणत कांगावा केला.
काल(दि.08) पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने भारतामध्ये जवळपास 50 ड्रॉन डागले. मात्र भारताने त्याचे सर्व हल्ले परतवून लावले. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यामध्ये हल्ला करण्यात आला. यामुळे अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले. पाकिस्तानचे हे हल्ल्याचे अनेक व्हिडिओ स्थानिकांनी देखील काढले आहेत. तसेच अनेक स्थानिकांनी हे हल्ले प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे पाकिस्तानने आपल्या कुरघोड्या लपवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने हल्ला न केल्याचे म्हणत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारतीय लष्कराने थेट व्हिडिओ जारी करुन पुरावाच हाती दिला आहे.
भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
भारतीय लष्कराच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भातली माहिती देण्यात आली असून ड्रोन हल्ल्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. “ऑपरेशन सिंदूर… पाकिस्तानी लष्कराने ८ आणि ९ मेदरम्यानच्या रात्री भास्ताच्या संपूर्ण पश्चिमेकडील सीमेलगत वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोन आणि इतर दारुगोळ्याचा वापर करून हल्ला केला. जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (LOC) पाकिस्तानी लष्करीने अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे पाकिस्तानच्या या ड्रोन हल्ल्यांना भारताकडून यशस्वीरीत्या निष्प्रभ करण्यात आले असून शस्त्रसंधी उल्लंघनालाही सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे”, असं भारतीय लष्करानं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
OPERATION SINDOOR
Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and… pic.twitter.com/WTdg1ahIZp
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 9, 2025
पाकिस्तानला भारतीय दलांनी चोख उत्तर दिले आहे. पाकिस्तानने हे हल्ले थांबवले नाही तर भारत देखील थांबणार नाही. अगदी शेवटपर्यंत उत्तर दिले जाईल, अशा कडक शब्दांत भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला दम देण्यात आला आहे. पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावण्यानंतर भारताच्या नौदल, लष्कर आणि वायू दलाने पाकिस्तानवर हल्ला केला. यामध्ये लाहोर आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामबादचे मोठे नुकसान झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताच्या ऑपरेशन सिंदूरपासून पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. त्याने भारतातील ११ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने डागलेले क्षेपणास्त्र भारताने हवेत पाडले. पाकिस्तानने अनेक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण तेही भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले आहे हे उल्लेखनीय आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन जे-१७ आणि एक एफ-१६ विमान पाडले आहे.