'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाक परराष्ट्र मंत्र्यांचा चीन दौरा; ड्रॅगनसोबत नेमका कोणता कट रचत आहे पाकिस्तान? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही तणाव आहेच. याच दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार सोमवारी (१९ मे) चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहे. चीनमध्ये इशाक दार चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. याचवेळी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुक्ताती यांनाही भेट देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि तीनचे परराष्ट्र मंत्र्यांची त्रिपक्षीय बैठक होणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्लाचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. या ऑपरेशन सिंदूर नंतर तिन्ही देशांची पहिली भेट होत आहे. अफगाणिस्तानने भारताला पाठिंबा दर्शवलाआहे. परंतु पाकिस्तान आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतची ही बैठक भारतासाठी चिंतेची बाब आहे.
अफगाणिस्तान, चीन आणि पाकिस्तानची ही बैठक चीनने आयोजित केली आहे. ही बैठक दक्षिण आशियामध्ये शांतता राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. भारत आणि पाकिस्तनमधील तणावामुळे दक्षिण आशियामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही चर्चा होत आहेत. यामध्ये प्रादेशिक व्यापार, सुरक्षा सहकार्य वाढण्यावर तिन्ही देश चर्चा करणार आहेत.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीनचे परराष्ट्र मंत्री व्यापाराला चालना देणे, सुरक्षा सहकार्य वाढवणे आणि प्रादेशिक विकास, तर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षावर चर्चा करतील असे म्हटले जात आहे.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीनंतर चीनने या कराराचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही देशांच्या दीर्घकालीन हितासाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी दोन्ही देशांनी योग्य पाऊल उचलले असल्याचे चीनने म्हटले आहे.
भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानने अफगाणिस्तानला संघर्षात ओढण्याचा प्रयत्न केला होता. भारताने अफगाणिस्तानवर हल्ले केल्याचा दावा पाकने केला होता. परंतु अफगाणिस्तानने हा दावा फेटाळला होता. तसेच अफगाणिस्तानच्या संसदेच्या सदस्य मरियम सोलोमानखिल भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले होते.
त्यांनी म्हटले होते की, भारत हा अफगाणिस्तानचा खरा मित्र आहे, संकटाच्या काळात भारताने आम्हाला नेहमीच मदत केली आहे. तसेच पाकिस्तान हा दहशतवादाचा देश आहे, यामुळे भारताने जे केले ते योग्यचे केले. आम्ही भारतासोबतच आहोत, पाकिस्तानसोबत कधी नव्हतो.
चीनने सुरुवातीपासूनच पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु अफगाणिस्तान एकीकडे पाठिंबा दर्शवत आहे, तर दुसरीकडे भारताच्या शत्रू देशांसोबत बैठका घेत आहे. यामुळे तिन्ही देशांमध्ये नेमकी कोणती खिचडी शिजवली जात आहे असा प्रश्न पडत आहे. तिन्ही देश मिळून भारताविरुद्ध काय योजन आखत असतील असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे तज्ज्ञांनी तिन्ही देशांच्या बैठकीला भारतासाठी धोक्याची घंटा म्हटले आहे.