गाझीचा अंत! LeTच्या टॉप कमांडरची पाकिस्तानात हत्या; भारतातील तीन मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू ठार झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडलेल्या गोळीबारात लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ कमांडर सैफुल्लाहा खालिद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधच्या मटली शहरात ही घटना घडली. खालिद घराबाहेर पडला यावेळी अत्रात हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झालाची माहिती आहे.
अबू सैफुल्लाह खालिद हा मालन भागाचा रहिवासी होता. त्याने काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणळ्या आहे. भारतात त्याने जिहाद करुन परत्यानंतर त्याला लष्कराने गाझीची उपाधी दिली होती. लष्कर-ए-तैयबाच्या संघटनेचा अगदी महत्त्वाचा व्यक्त होते. त्याला सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती. परंतु आज पाकिस्तान सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
खालिद सैफुल्लाहने पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर लष्करासाठी भरती आणि निधी उभारण्याच्या मोहीमांमध्ये सहभागी घेतला होता. त्यांच्या हत्येमुळे ही एक नियोजित टार्गेट किलिंग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या घटनेने पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण केली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमधील दहशतवादी गटांमध्ये अंतर्गत संघर्ष, मतभेद आणि टकराव वाढला आहे.
यामुळे पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना देखील अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. अशातच पाकिस्तानच्या प्रमुख खैबर पख्तूनख्वा प्रांतात देखील मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात अडकलेला आहे. तसेच दहशतवाद्याच्या अडचणीचा सामान पाकिस्तान करत आहे. शिवाय बलुचिस्तानने स्वतंत्र होण्याची मागणी केली आहे. आणि याच वेळी भारतासोबतही पाकिस्तानचा तणाव वाढत आहे. यामुळे पाकिस्तानची चारीबाजूने कोंडी झाली आहे.