फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बलुचिस्तानवर कब्जा केलेल्या पाकिस्तान साठी मंगळवार वारचा दिवस हा कायमचा लक्षात राहील . कारण मंगळवारी सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालं आहे . ज्याच्यात असं लिहलं आहे कि बलुचिस्तानच्या ८५ % भागावर द रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानच्या सेनेने पुन्हा आपली जमीन मिळवली आहे . त्याचबरोबर त्यांनी स्वतःचे राष्ट्रीय गीत , झेंडा , करंसी आणि प्रशासन व्यवस्था लागू करण्यात आली आहे . असे लिहलं आहे . बलुचिस्तानचे मानवाधिकार मीर यार बलोच यांनी एक्स वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे . आता बलुचिस्तानच्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीवर आणि सार्वजनिक संपत्तीवर पूर्णपणे त्यांच्या अधिकार असेल , बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्यास आम्ही पात्र आहोत , याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे . १५० पेक्षा जास्त सुरु गॅस फिल्ड्स ,१२०० पेक्षा जास्त कोळसा खाणी यावर बलुचिस्तानचा पूर्णपणे कंट्रोल आता असेल . या पत्राची जगभरात चर्चा सुरु झाली आहे .
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लेटर मध्ये असे सांगितले आहे कि , रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान च्या हद्दीत असलेल्या सर्व जमिनीवर , साधन संपत्तीवर पूर्णपणे हक्क आणि कंट्रोल आता बलुचिस्तान सरकारकडे असेल . यामध्ये दुसऱ्या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप म्हणजे बलुचिस्तानच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण असेल . याचबरोबर पाकिस्तानच्या सुरक्षा एजन्सी मधील लोकांचा एक मोठा समूह नोकऱ्या सोडून बलुचिस्तान सोबत येण्यासोबत सकारात्मक आहे . या संदर्भात लिहलं आहे .
मॅक्रॉनच्या एका निर्णयामुळे रशियात खळबळ! आता युक्रेनच्या भूमीवर बनणार फ्रान्सची घातक शस्त्रे
बऱ्याच वर्षां पासून बलुचिस्तान मध्ये पाकिस्तान विरुद्ध आंदोलने सुरु आहेत . असिफ मुनीर आणि शहाबाज शरीफ विरोधात घोषणाबाजी ही रोजच घडणारी घटना तिथे आहे . परंतु बलुचिस्तानने आता स्वतःला स्वतंत्र घोषित करून पाकिस्तानची डोके दुःखी वाढवली आहे . मात्र सोशल मीडियावर फिरणारे पत्र अधिकृत असण्याबाबत अजून खात्री झालेली नाही . तसेच याच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही देशाने अजून तरी बलुचिस्तानला मान्यता देण्याची घोषणा केलेली नाही . मागील काही महिन्यांपासून बलुचिस्तान मधील हिंसा वाढली असून , बलूच विद्रोही आणि तहरीक – ए – तालिबान पाकिस्तान वारंवार सुरक्षा रक्षकांवर हल्ले चढवत आहे . माहितीच्या आधारे ५ जुलै पासून आत्तापर्यंत जवळपास १०९ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे .






