" />
India Pakistan Conflict : भारताने UNSC पाकिस्तानची बोलती केली बंद; दहशतवादावर भर सभेत सर्जिकल स्ट्राईक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची उमेदवारी , भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) 2028-29 च्या कार्यकाळासाठी अस्थायी सदस्य बनण्याचा प्रचार सुरू केला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘SHANTI’ या दूरदृष्टीसह भारताची उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठीची निवडणूक जून 2027 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत गुप्त मतदानाने होईल. यामध्ये विजय मिळवण्यासाठी भारताला किमान 128 ते 129 देशांच्या पाठिंब्याची गरज आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भारताला अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिजी आणि श्रीलंका यांच्यासह अनेक देशांचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र, आशिया-प्रशांत समूहातील एकमेव जागेसाठी भारताचा सामना ताजिकिस्तानशी होईल, त्यामुळे ही निवडणूक रंजक मानली जात आहे. तरीही, ताजिकिस्तानच्या तुलनेत भारताचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. चला, जाणून घेऊया भारतासाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे? आणि यामध्ये विजय मिळाल्याने भारताला कोणते फायदे होतील?
UNSC च्या 10 अस्थायी जागा वेगवेगळ्या प्रादेशिक समूहांच्या आधारावर विभागल्या जातात. 2028-29 च्या कार्यकाळासाठी आशिया-प्रशांत समूहातील एका जागेसाठी भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात स्पर्धा होईल. निवडणूक संयुक्त राष्ट्र महासभेत गुप्त मतदानाने होईल आणि विजयासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. भारताचा मागील रेकॉर्ड मजबूत राहिला आहे. 2021 च्या निवडणुकीत त्याला 192 पैकी 184 मते मिळाली होती. याच कारणामुळे यावेळी देखील भारताला मजबूत दावेदार मानले जात आहे.
इराण घेणार खामेनेईंच्या हत्येचा बदला; ट्रम्प, नेतन्याहूंसह जगातील ‘हे’ 13 नेते ‘किल लिस्ट’मध्ये
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य असतात. त्यामध्ये 5 स्थायी सदस्य आणि 10 अस्थायी सदस्यांचा समावेश असतो. स्थायी सदस्यांना वीटो अधिकार असतो, तर अस्थायी सदस्य दोन वर्षांसाठी निवडले जातात आणि त्यांना वीटो मिळत नाही. कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यासाठी किमान 9 मते आवश्यक असतात आणि कोणत्याही स्थायी सदस्याने वीटो केलेला नसावा.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सदस्यता ही भारताला आतंकवाद आणि वैश्विक सुरक्षा यावर आपली बाजू मजबुतीने जगासमोर ठेवायची संधी देते . त्याच बरोबर भारत हा स्वतःला ग्लोबल साऊथ चा महत्वपूर्ण आवाज म्हणून जागा निर्माण करू पाहतोय . युक्रेन युद्ध , गाझा संघर्ष ,इराण इज्राइल अमेरिका तणाव या सारख्या विषयावर भारताने चर्चा आणि कूटनीतीने प्रश्न सोडवण्यावर नेहमीच भर दिली आहे .






