पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (फोटो- सोशल मिडिया)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान गेल्या काही काळापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेची शक्यता कमी दिसत असून त्यांच्या सर्थकांनी दावा केला आहे की, त्यांना तुरुंगात ठेवणे हे पाकिस्तानच्या लोकशाही आणि कायद्याच्या विरोधात आहे. दरम्यान तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी केलेले प्रयत्न अशा कामगिरीसाठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स आणि नॉर्वेजियन राजकीय पक्ष सेंट्रम यांनी दिली.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तान वर्ल्ड अलायन्सची स्थापना झाली आहे. यामधील सदस्यांनी इम्रान खान यांच्या नावाची घोषणा केली आहे. जे नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टी सेंट्रमचे सदस्य देखील आहेत. नॉर्वेजियन नोबेल समितीकडे अनेक नामांकन दाखल होत असतात. त्यानंतर पुढील 8 महीने याची प्रक्रिया सुरू असते. त्यानंतर या पुरस्काराचा विजेता घोषित केला जातो.
इम्रान खान आणि त्याची पत्नी तुरुंगात
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाने 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टशी संबंधित 190 दशलक्ष पौंड घोटाळ्यात ही शिक्षा देण्यात आली आहे. याशिवाय त्यांची पत्नी बुशरा बीबी हिलाही या प्रकरणात दोषी ठरवून 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रष्टाचार पाहता न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी 14 वर्षांची तर त्यांच्या पत्नीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी हिलाही 7 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. डिसेंबर 2023 मध्ये पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) हा गुन्हा नोंदवला होता. 72 वर्षीय खान, 50 वर्षीय बुशरा बीबी आणि इतर 6 जणांनी मिळून 190 दशलक्ष पौंड (सुमारे 50 अब्ज पाकिस्तानी रुपये) राष्ट्रीय तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
दोघेही अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी
अल-कादिर ट्रस्ट प्रकरण हा पाकिस्तानातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यासह एका प्रॉपर्टी व्यावसायिकाने सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील इतर आरोपी देशाबाहेर आहेत, त्यामुळे इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यावरच खटला चालवला जात आहे.