वॉशिंग्टन: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या काही संवेदनशील भागांत नागरिकांना प्रवास नकरण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र विभागाने (08 मार्च) रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत-पाकिस्तान सीमा, नियंत्रण रेषा (LoC), तसेच बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या भागांत जाणे धोकादायक ठरु शकते असे म्हटले आहे. या भागांमध्ये दहशतवादी कारवाया, सशस्त्र संघर्ष आणि अपहरणाच्या घटना घडत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
पाकिस्तानमधे दहशतवादी संघटना
अमेरिकेने आपल्या नागरिकांना बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा भागात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय, पाकिस्तानच्या परिस्थितीवर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, या भागांमध्ये अनेक दहशतवादी संघटना आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे प्रदेश अत्यंत अस्थिर बनले हे. या भागांतील कायदा-सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि स्थानिक प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत करु शकत नाही.
अमेरिकेचा गंभीर इशारा
या निवेदनात नागरिकांनी पाकिस्तानमध्ये राहण्याचा किंवा प्रवास करण्याचा टाळण्यास आणि सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, स्थानिक परिस्थितीची माहिती करुन घ्यावी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खबकदाकी घेण्यास निवेदनात सांगण्यात आले आहे. यापूर्वीही अमेरिकेने पाकिस्तानच्या काही भागांमध्ये प्रवास न करण्याचा इशारा नागरिकांना दिली होता. मात्र, सद्य परिस्थिती पाहाता हा इशारा गंभीर मानला जात आहे. पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढले असून सुरक्षेची परिस्थिती बिघडलेली आहे.
अमेरिकन नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे
यात्रेवर जाणाऱ्या किवां पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अमेरिकेन नागरिकांना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्यास परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन दूतावासाशी नियमित संपर्क ठेवण्यास नागरिकांना सल्ला दिला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यांची शक्यता असलेल्या ठिकाणांपासून दूर राहण्यास आणि स्थानिक कायदे, नियम पाळण्यास मंत्रालयाने सांगितले आहे.
शिवाय, वाहतूक आणि सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासही सांगण्याच आले आहे. तसेच अमेरिकन सकतराने अशा परिस्थितीत अमेरिकन नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करुन निर्णय घ्यावा. शक्यतो पाकिस्तानला संभाव्य प्रवास टाळावा. तसेच पाकिस्तानातील नागरिकांनी, सतर्कता बाळगावी असे सांगण्यात आले आहे.