पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका! बलुच हल्ल्यानंतर लष्करप्रमुख असीम मुनीर संतापले, शाहबाज सरकारवर टीकास्त्र ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये झालेल्या भीषण ट्रेन हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय आणि लष्करी भूकंप निर्माण झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने ट्रेनचे अपहरण करून तब्बल 100 हून अधिक पाकिस्तानी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी संताप व्यक्त करत देशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर कडाडून टीका करत पाकिस्तानला अधिक ‘कठोर’ देश बनवण्याची गरज असल्याचे सांगितले.
बलुचिस्तानच्या बोलान भागात घडलेल्या या घटनेने संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. BLA च्या मजीद ब्रिगेडने हा हल्ला केला असून, त्यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांना ओलीस धरल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक संसदीय समितीची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती, ज्यात लष्करप्रमुख मुनीर यांनी पाकिस्तान सरकारच्या असमर्थतेवर बोट ठेवले.
मुनीर म्हणाले, “पाकिस्तानला कठोर देश बनवण्याची वेळ आली आहे. जर शासन व्यवस्थित चालले नाही, तर लष्कर आणि सैनिकांचे रक्त किती दिवस ही पोकळी भरत राहणार?” त्यांनी पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाला आव्हान दिले की, जर आताच कठोर पावले उचलली नाहीत, तर देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tesla Data Leak: Elon Muskच्या कंपनीवर सायबर अटॅक करून हॅकर्सनी ठेवली विचित्र अट
पाकिस्तानातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत BLA सारखे बंडखोर संघटना अधिक हिंसक होत आहेत. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये लष्करावर वारंवार हल्ले होत आहेत, आणि पाकिस्तानी सरकार त्याला प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरत आहे. या घटनेने पाकिस्तानी लष्कराच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारत आणि अफगाणिस्तानवर आरोप करत दावा केला की, BLA ला त्यांचा गुप्त पाठिंबा मिळत आहे. मात्र, पाकिस्तानकडे यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. भारताने या आरोपांना साफ नाकारले असून, पाकिस्तानमधील अंतर्गत अस्थिरतेसाठी ते स्वतःच जबाबदार असल्याचे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट आधी वापरून मग चोरट्यांनी केले लंपास; वाचा ‘हा’ मजेदार किस्सा
सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलवण्यात आलेल्या संसदीय बैठकीवर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने बहिष्कार