'युद्धाने फक्त विनाशच होतो, संवाद हाच उपाय' ; रशिया-युक्रेन संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रसिद्धी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनसोबतचा एक खास पॉडकास्ट रविवारी (16 मार्च) प्रसिद्ध झाला. या पॉडकास्ट दरम्यान पंतप्रधान मोदींनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसासंबंधित, तसेच विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, AI , लोकशाही, जागतिक कूटनिती आणि अध्यात्मावर आपले विचार मांडले. यावेळी त्यांना लेक्स फ्रीडमन यांनी जगातील युद्धावर प्रश्न विचारला होता, यावरही पंतप्रधानांनी आपले मत स्पष्ट केले.
भारत शांततेवर विश्वास ठेवतो
लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधानांना विचारले की, सध्या जगभर अनेक युद्ध सुरु आहेत, रशिया-युक्रेनमधील सुरु असलेल्या युद्धावर शांततेसाठी प्रयत्न सुरु आहेत. यावर तुम्ही काय करु शकाल? यावर उततर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, “मी अशा देशाचे प्रतिनिधित्व करतो, जो भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे. या दोन महापुरुषांची तत्वे शांततेच्या मार्गावर चालणारी आहेत. यामुळए सांसक्तिक आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून भारताची भूमिका अत्यंत मजबूत आहे. भारत नेहमीच शांततेवर विश्वास ठेवतो. भारता हा समन्वय आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणारा देश आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शांतता चर्चा करण्याचा दोन्ही देशांना सल्ला
नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, भारत कधीच युद्धाचे समर्थन करत नाही. त्यांनी म्हटले की, माझे रशियाशी आणि युक्रेनशी घनिष्ठ संबंध आहेत. मी अध्य पुतिन यांच्याशी चर्चा करेन, त्यांना सांगेन की, ही युद्धाची वेळ नाही आणि झेलेन्स्की यांना मित्रत्वाने सांगेन की, जग तुमच्या पाठीशी उभे राहिले तरी युद्धाने समाधान मिळणार नाही. यासाठी संवाद हाच एकमेव उपाय आहे. दोन्ही देशांनी वाटाघाटसाठी एकत्र येऊन तोडागा काढला पाहिजे, युद्धाने केवळ विनाशच होतो.
युक्रेन-रशिया युद्धामुळे ग्लोबल साउथला फटका
पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, संपूर्ण जगाने एकत्र बसून युक्रेनसोबत चर्चा करण्याने काही साध्या होणार नाही, यामध्ये रशिया आणि यूक्रेन या दोन्ही देशांचा सहभाग हवा. या युद्धामुळे केवळ दोन्ही देशांचेच नुकसान झालेले नाही, तर याचा सर्वाधिक फटका ग्लोबल साउथच्या देशांना बसला आहे. या युद्धामुळे अन्न, इंधन आणि खतांच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष रशिया-आणि यूक्रेनच्या युद्धबंदीची अपेक्षा ठेवून आहे. मी नेहमीच सांगतो, माझा भूमिका कोणा एका देशाच्या बाजूने नाही, तर शांततेच्या बाजूने आहे.