इराणमध्ये (Iran) सध्या हिजाब विरोधी आंदोलनं (Hijab Protest) चांगलच चिघळलं आहे. देशातील महिला हिजाबला विरोध करत रस्त्यावर उतरल्या आहेत. हा वाद अद्याप सुटायचा असून आता इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका न्यूज चॅनलच्या अँकरने हिजाब घालण्यास नकार दिल्याने इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सीएएन वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकार क्रिस्टीन एमनपोर (Christiane Amanpour) यांनी हा दावा केल्याची माहिती आहे.
[read_also content=”पुण्याच्या नेहा नारखेडेनं 37 व्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान, ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती https://www.navarashtra.com/latest-news/pune-neha-narkhede-has-won-the-37th-place-in-indias-richest-list-nrps-328840.html”]
इराणमध्ये महिलांकडून सध्या हिजाबविरोधी निदर्शनं करण्यात येत आहेत. हिजाबला विरोध करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणावर सरकार विरोधात बोलत आहेत. अशातच अमेरीकेत एका न्यूज कार्यक्रमात इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची मुलाखत घेण्यात येणार होती. मात्र, चॅनलच्या अमेरिकन महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिला त्यामुळे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी मुलाखत देणं नाकारलं अशी माहिती समोर आली आहे.
[read_also content=”दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजीराजे छत्रपती यांची घेतली भेट, चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/india/cm-eknath-shinde-meet-to-sambhaji-raje-chhatrapati-in-delhi-328780.html”]
इराणमध्ये सध्या महिला हिजाब घालण्याचा विरोध करत आहेत. महसा अमिनीचा या 22 वर्षीय तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानं या देशभरातील महिला आक्रमक होऊन रस्त्यावर यायला सुरुवात झाली. तसेच महसा अमिनीला न्याय देण्याची मागणी करू लागल्या. अशातच हे वातावरण दिवसेंदिवस तापत असून आता अनेक महीला महिलांकडून केस कापून आणि हिजाब जाळून निषेध करत आहेत.