पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (PM Narendra Modi ) अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास ते न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. शहरातील जॉन एफ केनेडी विमानतळावर आलेल्या प्रवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या मोठ्या संख्येने अनिवासी भारतीयांशी हस्तांदोलन केले आणि संवादही साधला. यावेळी अनिवासी भारतीयांनी भारत मातेचा जयघोष केला. आज संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित योग दिन सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करणार आहेत.
[read_also content=”‘प्रवास नतरं आधी या पोरींना आवरा’, मेट्रोमध्ये केस स्ट्रेट करणाऱ्या तरुणीवर भडकले लोकं; म्हणाले ही मेट्रो आहे की ब्युटी पार्लर? https://www.navarashtra.com/viral/a-girl-straightening-her-hair-in-the-delhi-metro-video-goes-viral-nrps-418777.html”]
न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट न्यूयॉर्कला पोहोचल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, 21 जून रोजी योग दिन कार्यक्रमात सामील होण्यासाठी आणि नेत्यांसोबत विचार सामायिक करण्यासाठी उत्सुक आहोत. यासोबतच पीएम मोदींनी न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर काही फोटोही शेअर केले आहेत.
Landed in New York City. Looking forward to the programmes here including interaction with thought leaders and the Yoga Day programme tomorrow, 21st June. pic.twitter.com/6V5gHglLCg
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2023
न्यूयॉर्कच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी सीईओ, नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ, कलाकार, वैज्ञानिक, अभ्यासक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटतील.23 जून रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन संयुक्तपणे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करतील. याशिवाय, पंतप्रधान सीईओ आणि भारतीय डायस्पोरा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटतील.
परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी माहिती दिली की, पंतप्रधान मोदी 24-25 जून रोजी इजिप्तला भेट देणार आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. येथील 11व्या शतकातील वोहरा समाजाच्या अल-हकीम मशिदीला ते भेट देतील. पहिल्या महायुद्धात इजिप्तसाठी लढताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांनाही ते श्रद्धांजली अर्पण करतील. यासोबतच अनेक करारांवरही स्वाक्षऱ्या होणार आहेत.
अमेरिकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉल ऑफ स्ट्रीट जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. पीएम मोदींनी ट्विट केले की वॉल स्ट्रीट जर्नलशी झालेल्या संभाषणात त्यांनी भारत-अमेरिका संबंधांवर आपले विचार मांडले. वॉल ऑफ स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, संभाषणादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंध खूप मजबूत आणि खोल आहेत.
मुलाखतीदरम्यान, पंतप्रधान म्हणाले की मी स्वतंत्र भारतात जन्मलेला पहिला पंतप्रधान आहे, त्यामुळे माझी विचार प्रक्रिया, आचार, मी जे काही बोलतो आणि करतो ते सर्व माझ्या देशाच्या वैशिष्ठ्य आणि परंपरांनी प्रेरित आणि प्रभावित आहेत. हे मला बळ देते. माझा विश्वास आहे की भारत जागतिक स्तरावर अतिशय उच्च, खोल आणि व्यापक व्यक्तिरेखा आणि भूमिका निभावण्यास पात्र आहे. पीएम मोदी पुढे म्हणाले की, सुरक्षा परिषदेतील विद्यमान सदस्यत्वाचे मूल्यांकन व्हायला हवे. जगाला विचारले पाहिजे की परिषदेत भारत हवा आहे का? भारत संपूर्ण जगात शांतता राखण्यासाठी लष्करी योगदान देणारा महत्त्वाचा देश आहे. आज जागतिक राजकारण ते अर्थव्यवस्थेत भारताच्या भूमिकेची वेळ आली आहे.