चीनमध्ये येणार महावादळ (फोटो- istockphoto)
चीनमध्ये येणार महावादळ
शाळांना सुट्टी, नागरिक सतर्क
230 किमी प्रतितास वेगाने येत आहे महावादळ
China News: चीनमध्ये एक मोठ संकट येत आहे. हे संकट नैसर्गिक संकट आहे. चीनमध्ये येणारी हे सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे म्हटले जात आहे. रगासा नावाचे एक वादळ चीनच्या दिशेने येत आहे. त्यामुळे चीनमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चीनमध्ये येणारे रगासा महावादळ हे सर्वात मोठे वादळ असल्याचे म्हटले जात आहे.
चीनमध्ये येणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधल्या नागरिकांनी आतापासूनच सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे. खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या नैसर्गिक आपत्तीला तो देण्यासाठी चीनने आपली तयारी सुरू करण्यात आली आहे.
चीनमध्ये येत असलेल्या वादळाचे नाव रगासा असे आहे. या वादळामुळे चीनमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वादळाने फीलिपिन्सला देखील झोडपून काढले आहे. हजारो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे चीनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चीनमध्ये रगासा महावादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या भागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. विमानांची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हे वादळ 230 किमी प्रतीतास वेगाने चीनकडे येत आहे. समुद्रकिनारी भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे समुद्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
काही दिवसांआधी आले होते तपाह चक्रीवादळ
चीन देशात चक्रीवादळ आले आहे होते. चीनमध्ये नैसर्गिक आपत्ती आली होती. Tropical चक्रीवादळामुळे चीनमध्ये हाहा:कार उडाल्याचे पाहायला मिळाले. जगभरातील अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्ती येताना पाहायला मिळत आहे. चीनमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते.
Tropical Cyclone: बलाढ्य चीनला चक्रीवादळाचा मोठा फटका! 170 प्रतितास वेगाने वारा थेट…
चीनजवळील काही भाग व हाँगकाँग परिसरात तपाह चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. जनजीवन विस्कळीत झाले होते. या परिसरात वाऱ्याचा वेग 170 किमी प्रतीतास इतका होता. या चक्रीवादळामुळे भूस्खलन किंवा अन्य नुकससन झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र वाऱ्याचा वेग पाहता चीनमधील जनजीवन आणखी विस्कळीत झाले असल्याचे म्हटले गेले.