रशिया-जपानमध्ये युद्ध पेटणार (फोटो- सोशल मीडिया)
1. रशियाने जपानजवळ उभी केली पाणबुडी
2. संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण
3. आशिया-प्रशांत क्षेत्रात वाढला तणाव
Russia Vs World: रशियाने सध्या जगातील देशांची चिंता वाढवली आहे. रशिया युक्रेनविरुद्ध युद्ध लढत आहे. त्यातच आता रशियाने जपानजवळ आपली अत्याधुनिक घातक अशी आण्विक पाणबुडी तैनात केली आहे. त्यामुळे जपानसह अमेरिकेची देखील चिंता वाढली आहे. रशिया नेमके काय करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसरे विश्वयुद्ध होते की काय अशी चिंता सर्वांना लागली आहे. पुतीन यांनी असा निर्णय घेतल्याने जगाची चिंता वाढली आहे.
रशियाने जपानजवळ आपली घातक आण्विक पाणबुडी तैनात केली आहे. रशियाने उचलेल्या या पावलामुळे चीन आणि रशिया यांच्यातील सागरी ताकद आशिया-पॅसेफिक प्रदेशात तणाव वाढवू शकते. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जपानने रशियावर अतिरिक्त आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाने यावरून जपानला कारवाईची धमकी दिली आहे.
कुरील बेटावरून रशिया आणि जपानमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे रशियाने जपानला इशारा देण्यासाठी आण्विक पाणबुडी तैनात केली आहे. त्यामुळे पुतीन तिसरे विश्वयुद्ध सुरू करतात की काय अशी चिंता जपान, अमेरिकेसह अन्य देशांना लागली आहे. रशिया तिसऱ्या विश्वयुद्धासाठी पूर्णपणे आण्विक तयारीत असल्याचा एक गुप्त खुलासा अमेरिकेने केल्याचे म्हटले जात आहे.
सध्या रशियाकडे 4560 आण्विक हत्यारे आहेत. अमेरीकेनंतर रशिया जगातील सर्वात दूसरा शक्तिशाली आण्विक देश आहे. रशियाने जवळपास 1500 पेक्षा जास्त आण्विक हत्यारे तयार ठेवल्याचे म्हटले जात आहे. तसेच रशिया आपली संरक्षण प्रणाली अजून अत्याधुनिक करत असल्याचे समोर आले आहे.
India Russia US: युक्रेनबाबत काय योजना आहे? संशयाच्या सावटाखाली Modi-Putin यांच्यात फोन कॉल
Modi-Putin यांच्यात फोन कॉल
नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन दरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेला तणाव आता एका नव्या वळणावर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर (India) लादलेला ५० टक्क्यांचा कर, भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का ठरला आहे. मात्र याचा परिणाम फक्त भारतापुरताच मर्यादित न राहता थेट रशियावर होत असल्याचा दावा नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी केला आहे.
या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी संवाद साधला. मोदींनी युक्रेनवरील रशियाची पुढील रणनीती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतावर कराचा भार वाढल्यामुळे नवी दिल्ली आता रशियाशी अधिक थेट आणि खुलेपणाने चर्चा करत असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, फोन कॉलद्वारे मोदी आणि पुतिन यांच्यात सतत संवाद सुरू आहे.