सीरियाचे परराष्ट्र मंत्री असाद अल-शैबानी आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (उजवीकडे) (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Syria news marathi : दमास्कस : इस्रायल आणि सीरियामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. यामुळे सध्या सीरियामध्ये तणावाचे वातावरण आहे. दरम्यान सीरियामध्ये अलीकडच्या काही इस्रायलच्या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे वादळ उठले आहे. सीरियाच्या नवीन सरकारचे अध्यक्ष अहमद अल-जुलानी यांनी अमेरिका व सौदी अरेबियाला दुर्लक्ष करच रशियाकडे धाव घेतली आहे.
रशियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरियाचे अध्यक्ष अल-जुलानी यांनी इस्रायलपासून बचाव करण्यासाठी रशियाकडे (Russia) मदत मागितली आहे. नुकतेच १ ऑगस्ट रोजी सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद अल-शबौनी यांनी सीरियाई समुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, इस्रायल सीमेवरील बफर झोनमध्ये पोलिसांची गस्त घालण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी रशियाकडे मागणी केली आहे.
‘Gold वर लागणार नाही Tariff’, भारत आणि रशियाशी तणावादरम्यान डोनाल्ड ट्रम्पचे मोठे विधान
इस्रायल (Israel) गोलान हाइट्समध्ये पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा सीरियाने केला आहे. यामुळे इस्रायलच्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी रशियन सैन्याची गोलान हाइट्सवर तैनाती महत्वाची आहे.तसेच सीमावर्ती भागांमध्ये देखील इस्रायलशी संवादाचे मार्ग मोकळे होतील, असे अल-जुलानी यांनी म्हटले आहे. अल-जुलानी यांनी हा निर्णया सीरियाच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर नव्या सरकारच्या कूटनीतिक संतूलनासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे.
सीरियामध्ये (Syria) बशर अल-असदच्या सत्तेच्या काळात सीमा भागांमध्ये रशियन सैन्याची तैनातीह होती. परंतु बशल अल-असदची सत्ता कोसळ्यावर रशियाने या भागांमधून आपले सैन्य माघारी बोलावले. यामुळे या भागांमध्ये इस्रायलच्या सीरियाविरोधी हालचाली वाढली. यामुळे सीरियाचे नवे सरकार सध्या चिंतेत आहे. यामुळेच सीरियाने रशियाच्या सीमाभागांमध्ये उपस्थितीबाबत पुन्हा चर्चा सुरु केली आहे.
इस्रायल आणि सीरियातील तणाव
इस्रायल आणि सीरियामध्ये तणाव वाढत चालला आहे. १६ जुलै रोजी इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कवर हल्ला केला होता. यामध्ये सीरियाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले होते. इस्रायलने ड्रुझ अल्पसंख्याक समुदायाच्या रक्षणासाठी हल्ला केला अशल्याचे म्हटले होते.या हल्ल्यानंतर तीव्र संघर्ष झाला होता. १४ जुलै रोजी झालेल्या ड्रुझ आणि बेदुइन समुदायातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने ही कारवाई केली होती.
दरम्यान इस्रायलचा तेव्हापासून सीरियामध्ये हस्तक्षेप वाढत आहे. यामुळे सीरियाने रशियाकडे सीमासुरक्षेसाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ताकदीसाठी मदतीची मागणी केली आहे.रशियाच्या सीरियातील पुनरागमनाने इस्रायलला तोंड देणे सीरियासाठी सोपे जाईल, असे मानले जात आहे.
इस्रायलच्या ‘गाझावर ताबा’ योजनेला ‘या’ मुस्लिम देशांनी केला विरोध; जाणून घ्या कोण काय म्हणाले?