ट्रम्पचा खेळ बिघडणार? पुतिनशी बैठकीपूर्वी युरोपिय देशांची ठाम भूमिका; युक्रेनशिवाय कोणताही करार अमान्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या दोन दिवसांत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी युद्धबंदीवर चर्चा करणार आहेत. अलास्कामध्ये ही बैठक होणार आहे. पण या बैठकीला युक्रेनचे अध्यक्ष किंवा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत. यामुळे युरोपीय संघाने याला तीव्र विरोध केला आहे. युरोपिय देशांच्या या भूमिकेमुळे ट्रम्प यांचा रशिया युक्रेन युद्धाचे नियोजन धोक्यात आले आहे.
युरोपीय देशांच्या मते, युक्रेनची जमिन ही त्यांच्या स्वत:ची असून याबाबात निर्णय घेण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे. परंतु ट्रम्प सध्या पुतिनशी चर्चा करुन हा प्रश्न स्वत:हाच सोडवण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.
पुतिनच्या जाळ्यात अडकले ट्रम्प? अलास्का बैठक रशियासाठी ठरणार ‘गेम चेंजर’?
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदीसाठी अलास्कामध्ये पुतिन सोबत ट्रम्प यांची बैठक होणार आहे. मात्र बैठकीपूर्वीच युरोपियन नेत्यांनी युद्धविरामासाठी आणि तणाव कमी करण्यासाठीच ही चर्चा होऊ शकते. मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी केवळ राजनैतिक मार्गच एकमेव उपाय आहे. यामुळे युरोप आणि युक्रेनच्या सुरक्षा हिंताचे रक्षण होईल. युरोपियन युनियनच्या सदस्यांनी याला समर्थन दिले आहे.
युरोपिय देशांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. पण यामुळे केवळ काही काळासाठी तणाव कमी होईल. परंतु युक्रेनच्या भविष्याला धोका कायम राहिल. शिवाय युक्रेनच्या सहभागाशिवाय झालेली चर्चा किंवा कोणताही करार युरोपिय देशांना मान्य नसले असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी ११ ऑगस्टला एक खळबळजनक विधान केले होते. त्यांनी केवळ दोन मिनिटांत चर्चेचा निकाल लागेल असे म्हटले होते. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले होते. यामुळे सध्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. परंतु यामुळे युरोपच्या आणि युक्रेनच्या सुरक्षेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या युक्रेनचा १९% भाग रशियाच्या ताब्यात आहे. यामुळे हा भाग परत मिळवण्यासाठी युक्रेनचा या बैठकीत सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र केवळ ट्रम्प आणि पुतिन यांच्या चर्चेने हे शक्य नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच युरोपीय देशांच्या हस्तक्षेपामुळे ट्रम्प यांच्या युक्रेन युद्ध संपवण्याचे स्वप्नात अडथळा येण्याची शक्यता आहे. यामुळे आता अलास्काबैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Russia Ukraine War : ट्रम्प-पुतिन चर्चेपूर्वी झेलेन्स्कींचा मोठा दावा ; म्हणाले, ‘रशियाला युद्ध…’