रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात येण्याच्या मार्गावर; पुतिन यांनी पहाटे ३ वाजेपर्यंत ट्रम्पच्या दूतांसोबत घेतली बैठक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Putin Trump envoys meeting Moscow 2026 : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाला(Russia Ukraine war) पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाची राजधानी मॉस्को आणि स्वित्झर्लंडमधील दावोस या दोन शहरांमध्ये सध्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राजनैतिक हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार, युद्ध थांबवण्यासाठी ‘बॅकडोर’ डिप्लोमसी वेगाने सुरू केली आहे.
गुरुवारी मध्यरात्री मॉस्कोमधील ‘क्रेमलिन’मध्ये एक मोठी घडामोड घडली. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी सुमारे चार तास चर्चा केली. रात्री १२ च्या सुमारास सुरू झालेली ही बैठक शुक्रवारी पहाटे ३ वाजेपर्यंत चालली. या बैठकीत रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह आणि किरिल दिमित्रीव्ह हेदेखील उपस्थित होते. या चर्चेचे वर्णन “अत्यंत प्रांजळ आणि फलदायी” असे करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Balasaheb Thackeray: निवडणूक न लढवताही त्यांनी दिल्लीचे तख्त हलवले; बाळ ठाकरेंचे ‘असे’ रहस्य ज्यामुळे सरकारही होते हादरले
मॉस्कोमध्ये चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हे युद्ध केवळ आर्थिक मुद्दा नसून लाखो लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यांनी जो बायडेन यांच्या धोरणांवर टीका करताना म्हटले की, “युक्रेनवर ३५० अब्ज डॉलर्स खर्च झाले आहेत आणि दरमहा हजारो सैनिक मारले जात आहेत, हे आता थांबायला हवे.” झेलेन्स्की यांनी या भेटीला सकारात्मक म्हटले असून, सुरक्षा हमी आणि हवाई संरक्षण (Air Defence) पॅकेजवर महत्त्वाचा करार झाल्याचे संकेत दिले आहेत.
President Trump said he thinks peace efforts over Russia’s war in Ukraine are getting close ahead of his planned meeting with Ukraine’s Volodymyr Zelenskyy later on Thursday in Davos, while his special envoys are prepared to meet with Russia’s Vladimir Putin in… pic.twitter.com/tfZhzlgO8c — NEWSMAX (@NEWSMAX) January 22, 2026
credit – social media and Twitter
या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी आता केवळ द्विपक्षीय चर्चा पुरेशी ठरत नाहीये. त्यामुळेच संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्यात एक त्रिपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत युद्धाचा नकाशा (Roadmap) आणि सीमावादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. रशियाने ‘टेरिटोरियल’ (प्रादेशिक) मुद्द्यावर तडजोड करण्याची मागणी केली असून, युक्रेन आपल्या सार्वभौमत्वासाठी अडून बसला आहे.
हे देखील वाचा : Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर
दावोसमध्ये बोलताना झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला आरसा दाखवला. ते म्हणाले, “युरोप भविष्याबद्दल चर्चा करण्यात वेळ घालवत आहे, पण आज आवश्यक निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे.” अमेरिकेचे पूर्ण लक्ष आता शांतता करारावर असताना युरोप मात्र दिशाहीन झाल्याची टीका त्यांनी केली.
Ans: युक्रेन युद्ध संपवण्यासाठी आणि शांतता कराराचा मसुदा तयार करण्यासाठी पुतिन आणि ट्रम्पच्या दूतांमध्ये ही बैठक झाली.
Ans: युरोप भविष्यातील संकटांवर फक्त चर्चा करतो, पण आज ठोस लष्करी किंवा राजकीय निर्णय घेण्यास घाबरतो, असे झेलेन्स्की यांनी म्हटले.
Ans: यामध्ये रशिया, युक्रेन आणि अमेरिका प्रत्यक्ष चर्चेसाठी एकाच व्यासपीठावर येणार असल्याने युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वाढली आहे.






