File Photo : Joe Biden
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (jo biden) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्या घरून गोपनीय कागदपत्रे मिळले असून या प्रकरणात त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. जो बायडेन यांच्या घरावर पुन्हा एकदा छापा टाकण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या छाप्यादरम्यान बिडेन यांच्या घरातून आणखी सहा गोपनीय कागदपत्रे सापडली आहेत, ज्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. बायडेनचे वैयक्तिक वकील बॉब बाऊर यांनी याला दुजोरा दिला आहे.
[read_also content=”अमेरिकन सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक! अल-शबाबचे 30 सैनिक ठार https://www.navarashtra.com/world/us-strike-kills-approximately-30-al-shabaab-fighters-in-somalia-nrps-363554.html”]
अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या डेलावेअरमधील विल्मिंग्टन येथील घराची झडती घेतली. या झडतीत पथकाने 6 कागदपत्रे त्यांनी ताब्यात घेतली. न्याय विभागाने सुमारे 12 तास जो बिडेन यांच्या घराची झडती घेतली. या शोधात विभागाने जो बिडेन यांच्या घरातून काही कागदपत्रे जप्त केली आहेत, जी त्यांच्या यूएस सिनेटच्या कार्यकाळाशी संबंधित आहेत. 1973 ते 2009 पर्यंत जो बिडेन यांनी डेलावेरचे प्रतिनिधित्व केले. 2009 ते 2017 पर्यंत ओबामा प्रशासनात जो बिडेन अध्यक्ष होते. न्याय विभागाच्या पथकाने त्यावेळची काही कागदपत्रेही सोबत घेतली आहेत.