Starlink News: एलोन मस्कच्या स्टारलिंकशी चिनी उपग्रह ३,७३२ वेळा टक्कर देणार होते, स्पेसएक्सने कशी मोठी दुर्घटना टाळली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Starlink Chinese satellite collision avoidance 2025 : एलोन मस्क (Elon Musk) यांची कंपनी ‘स्पेसएक्स’ (SpaceX) सध्या केवळ पृथ्वीवरच नाही, तर अंतराळातही एका मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. अमेरिकन फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनकडे (FCC) सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार, स्टारलिंक उपग्रहांनी गेल्या सहा महिन्यांत अवकाशातील भीषण टक्कर टाळण्यासाठी विक्रमी हालचाली केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये चिनी उपग्रह आणि तिथला अंतराळ कचरा स्टारलिंकसाठी सर्वात मोठा डोकेदुखी ठरला आहे.
स्पेसएक्सच्या अहवालानुसार, १ जून ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत स्टारलिंक उपग्रहांना १,४८,६९६ वेळा आपला ठरलेला मार्ग बदलावा लागला. जेव्हा दोन उपग्रह एकमेकांच्या धोक्याच्या अंतरावर येतात, तेव्हा त्यांची टक्कर टाळण्यासाठी केलेली ही हालचाल म्हणजे ‘मॅन्यूव्हर’ (Maneuver). सरासरी काढल्यास, स्टारलिंकचे उपग्रह दररोज शेकडो वेळा आपला मार्ग बदलत आहेत. यामुळे उपग्रहांचे इंधन (Propellant) वेगाने खर्च होत असून, त्यांचे आयुर्मानही कमी होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Penguin: अत्यंत हास्यास्पद! ‘आणि यांना ग्रीनलँड हवाय…’, व्हाईट हाऊसची ‘ती’ पोस्ट ठरली 2026 मधील सर्वात मोठे ट्रोलिंग
या संपूर्ण संघर्षात चिनी उपग्रहांची भूमिका संशयास्पद आणि धोकादायक ठरली आहे. चिनी कंपन्यांच्या उपग्रहांमुळे स्टारलिंकला ३,७३२ वेळा आपला मार्ग बदलावा लागला. यामध्ये हाँगक्सिंग टेक्नॉलॉजीचा ‘होंगहू-२’ (Honghu-2) हा उपग्रह सर्वात जास्त चर्चेत राहिला. या एकाच उपग्रहामुळे स्टारलिंकला तब्बल १,१४३ वेळा बाजूला व्हावे लागले. याशिवाय, चीनच्या ‘युन्याओ-१’ नक्षत्रातील उपग्रहांनीही ४३१ वेळा धोका निर्माण केला.
NEWS: SpaceX @Starlink is reconfiguring its constellation to improve space safety In 2026, around 4,400 Starlink satellites will be lowered from ~550 km to ~480 km, coordinated with regulators, other operators, and USSPACECOM. The lower altitude reduces orbital decay time by… pic.twitter.com/XdWOhqkZo0 — Dima Zeniuk (@DimaZeniuk) January 2, 2026
credit – social media and Twitter
केवळ सक्रिय उपग्रहच नाही, तर चीनने २००७ मध्ये केलेल्या ‘अँटी-सॅटेलाइट’ क्षेपणास्त्र चाचणीचा कचरा आजही स्टारलिंकसाठी कर्दनकाळ ठरत आहे. या जुन्या कचऱ्याच्या तुकड्यांमुळे ४१० वेळा टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच, नोव्हेंबर २०२२ मधील लाँग मार्च ६ए रॉकेटच्या प्रक्षेपणातून उरलेल्या ढिगाऱ्याने १७४८ वेळा स्टारलिंकला आपला रस्ता बदलण्यास भाग पाडले.
स्पेसएक्सने आपल्या अहवालात जागतिक समुदायासमोर एक मोठी तक्रार मांडली आहे. कंपनीच्या मते, प्रभावी टक्कर टाळण्यासाठी उपग्रह चालकांमध्ये डेटा शेअरिंग (Ephemerides) होणे आवश्यक आहे. मात्र, चिनी आणि रशियन ऑपरेटर्स त्यांच्या उपग्रहांची नेमकी स्थिती किंवा संपर्क माहिती शेअर करत नाहीत. यामुळे ‘ऑटोमॅटिक कोलिजन अव्हायडन्स सिस्टिम’ (ACAS) असूनही, माहितीच्या अभावामुळे मोठ्या अपघाताचा धोका कायम राहतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Immigration: इमिग्रेशन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; अमेरिकन कोर्टाचे भारतीय स्थलांतरितांच्या बाजूने 3 ऐतिहासिक निकाल
तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, जर अशा प्रकारे उपग्रहांची संख्या वाढत राहिली आणि समन्वय नसेल, तर अंतराळात ‘केसलर सिंड्रोम’ ओढवू शकतो. म्हणजे एका टक्करीमुळे इतका कचरा निर्माण होईल की तो इतर उपग्रहांना नष्ट करेल आणि पृथ्वीच्या कक्षेतील प्रवास कायमचा बंद होईल.
Ans: स्टारलिंक उपग्रहांमध्ये 'ऑटोमॅटिक कोलिजन अव्हायडन्स सिस्टिम' असते, जी ऑन-बोर्ड हॉल-इफेक्ट थ्रस्टर्सचा वापर करून इतर वस्तूंना स्वयंचलितपणे टाळते.
Ans: गेल्या सहा महिन्यांत चिनी उपग्रहांमुळे स्टारलिंकला ३,७३२ वेळा आपला मार्ग बदलावा लागला, ज्यातील ११४३ वेळा केवळ एकाच उपग्रहामुळे (Honghu-2) अडथळा आला.
Ans: स्पेसएक्सच्या मते, चीन आणि रशिया त्यांचे उपग्रह कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती शेअर करत नाहीत, ज्यामुळे टक्कर टाळणे कठीण होते.






