मोगादिशू : मुंबईतील ताज हॉटेलप्रमाणेच दहशतवाद्यांनी (Mumbai Terrorist Attack) सोमालियाची राजधानी मोदादिशूमधील (Mogadishu) हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट (Bombblast) केला; त्यानंतर दहशतवादी गोळीबार (Firing) करत हॉटेलमध्ये शिरले. हे सर्व दहशतवादी अल शबाब या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे
सोमालियात (Somalia) मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब (Al-Shabaab) या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जणांना रुग्णालयात दाखल केले असून ही घटना मोगादिशूमधील आहे. दहशतवाद्यांनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट केला. त्याचवेळी अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
8 civilians killed in Mogadishu hotel attack: Security official Read @ANI Story | https://t.co/MH69tUDMxP#Mogadishu #terrorist #Alshabab pic.twitter.com/tEBzQf80Tb — ANI Digital (@ani_digital) August 20, 2022
वृत्तसंस्था एएफपीशी या घटनेबाबत बोलताना सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी अजूनही हॉटेल हयातमध्ये आहेत आणि सुरक्षा दलांशी चकमक सुरू आहे. हॉटेल हयातवरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर जिहादी गटाचे सैनिक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.






