सोन्याच्या खजिना दडलाय 'या' देशांच्या मातीत; यात भारताचा समावेश आहे का? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोन्याचा साठा हा कोणत्याही देशाच्या आर्थिक अस्थिरतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतो. आर्थिक अनिश्चिततेच्या काळ्यात हे साठ्या देशाचे जागतिक स्तरावर स्थान मजबूत करण्याचे काम करतो. सोने हा केवळ मौल्यवान धातू नसून तो, आंतरराष्ट्रीय व्यापर आणि आर्थिक स्थिरतेचा आधार स्तंभ आहे. यामुळे अनेक लोक आणि देश सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक देखील करतात. 19व्या आणि 20व्या शतकात “गोल्ड स्टँडर्ड” प्रणाली अस्तित्वात होती. यामध्ये देशांनी आपल्या चलनाला सोनेाच्या किमतीशी जोडले होते, यामुळे लोक कागदी नोटांचे सोनेात रूपांतर करू शकत. या प्रणालीमुळे सोने हा देशाच्या आर्थिक स्थिरतेचा आधार होता.
आधुनिक काळात सोन्याचे महत्त्व
1970 नंतर गोल्ड स्टँडर्ड प्रणाली संपुष्टात आली, पण सोने आजही सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. जागतिक आर्थिक संकटाच्या काळात देशाचे सोने साठा त्याच्या आर्थिक साखेसाठी महत्त्वाचा ठरतो. देशातील आर्थिक अस्थिरतेच्या वेळीही सोने देशाची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यास मदत करते. आज आपण जगभरातील अशा देशांची नावे जाणून घेणार आहोत, ज्यांच्याकडे सर्वाधिक सोन्याचे साठे आहेत.
पहिले पाच देश
मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या स्थानावर अमेरिका असून, त्यांच्याकडे 8,133.46 टन तर दुसऱ्या स्थानावर 3,351.53 टनासह जर्मनीचे स्थान येते. त्यानंतर इटली 2,451.84 टनासह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर 2,436.97 टनाचा साठा फ्रान्सकडे आहे. तर पाचव्या स्थानी 2,335.85 टनाच्या सोन्याच्या साठ्यासह रशिया आहे.
भारत आठव्या क्रमांकावर
त्यानंतर चीन, जपान सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. आठव्या क्रमांकावर भारत असून भारताकडे 840.76 टन सोन्याचा साठा आहे. नंतर नेदरलँड्स, तुर्की, पोर्तुगाल, उझबेकिस्तान, यूके, कझाकस्तान या देशांचे नाव येते. त्यानंतर शेवटच्या पाच देशामध्ये स्पेन, ऑस्ट्रिया, थायलंड, सिंगापूर बेल्जियम हे देश येतात.
सोन्याचा एकूण साठा
सध्या जगात सुमारे 244,000 मेट्रिक टन सोने शोधले गेले आहे. यातील 187,000 टन सोने आधीच उत्पादनात आले आहे, तर 57,000 टन भूमिगत साठा आहे. आर्थिक स्थिरता आणि देशाचे वित्तीय संकटात रक्षण करण्यासाठी सोन्याचा साठा उपयोगी आहे.
देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सोन्याचे साठे महत्त्वाचे
सोन्याच्या साठ्यामुळे सोने चलनाची ताकद टिकवून ठेवता येते, तसेच जागतिक विश्वासार्हता जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोने व्यापार व कर्ज व्यवहारासाठी महत्त्वाचे असते. सोन्याचा साठा देशाच्या आर्थिक स्थिरतेचे प्रतीक असून, जागतिक आर्थिक संकटांमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची राहते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- श्रीलंकेत ट्रेनला धडकून 6 हत्तींचा मृत्यू; 2 जखमींवर उपचार सुरु