इराणचे सर्वोच नेते खामेनेई अमेरिकेसोबत संवाद करायला तयार आहेत; ट्रम्प यांनी केला मोठा दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump Iran meeting claim January 2026 : इराणमधील (Iran) अंतर्गत निदर्शने आता जागतिक युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अलिकडेच इराणला लष्करी हल्ल्याची उघड धमकी दिल्यानंतर, आता इराणच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसत आहे. ११ जानेवारी रोजी एअर फोर्स वन (Air Force One) विमानात पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी संपर्क साधला असून लवकरच दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्वक सांगितले की, “इराणी नेत्यांनी काल (१० जानेवारी) आम्हाला फोन केला होता. त्यांना आता वाटाघाटी करायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही बैठकीचे नियोजन करत आहोत.” तथापि, ट्रम्प इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढे एक गंभीर इशाराही दिला. ते म्हणाले, “बैठक ठरली असली तरी, प्रत्यक्ष चर्चेपूर्वी आम्हाला कदाचित काही ‘ॲक्शन’ घ्यावी लागेल.” ट्रम्प यांच्या या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, बैठकीच्या मेजावर बसण्यापूर्वी अमेरिका इराणवर मोठा लष्करी दबाव निर्माण करू शकते किंवा त्यांच्या मोक्याच्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात पुन्हा फुत्कारले दहशतवादाचे अजगर; 1000 सुसाईड बॉम्बर तयार, Masood Azharचा ‘ऑडिओ’ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान
इराणच्या या बचावात्मक पवित्र्यामागे एक मोठे कारण असल्याचे मानले जाते. अलिकडेच अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये हस्तक्षेप करून निकोलस मादुरो यांना सत्तेवरून खाली खेचले आहे. हीच भीती आता इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांना, विशेषतः अयातुल्ला अली खामेनी यांना सतावत आहे. जर इराणने आपल्या निदर्शकांवर बळाचा वापर सुरू ठेवला, तर अमेरिकन सैन्य थेट तेहरानवर हल्ले करू शकते, असा सज्जड दम ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी खामेनी चर्चेचा मार्ग स्वीकारत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘Iran leaders call yesterday to negotiate but we may’ strike anyway — Trump pic.twitter.com/D73PjZd0dW — RT (@RT_com) January 12, 2026
credit : social media and Twitter
दुसरीकडे, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्हीवरून देशाला संबोधित करताना जनतेला भावनिक साद घातली आहे. त्यांनी कबूल केले की, लोकांच्या ८०% तक्रारी रास्त आहेत, पण आंदोलनाच्या नावाखाली मशिदी आणि दुकाने जाळणारे लोक हे ‘परकीय हस्तक’ आणि ‘दहशतवादी’ आहेत. पेझेश्कियान यांनी थेट अमेरिकेवर निशाणा साधत म्हटले की, “अमेरिका आपल्या अर्थव्यवस्थेचा शस्त्र म्हणून वापर करत आहे आणि देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया, आम्हाला साथ द्या आणि देशाच्या पाठीशी उभे राहा.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PSLVC62: ISROचे देशाच्या सीमा सुरक्षा उपग्रहाचे स्वप्न भंगले; तिसऱ्या टप्प्यातील ‘त्या’ तांत्रिक बिघाडामुळे घात, मिशन अयशस्वी
ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणमधील हिंसाचारावर अमेरिकन लष्कर बारकाईने लक्ष ठेवून आहे. निदर्शकांच्या मृत्यूमुळे परिस्थिती चिघळली असून अमेरिका ‘व्हेरी स्ट्रॉन्ग’ (खूप शक्तिशाली) पर्यायांवर विचार करत आहे. यामध्ये इराणचे इंटरनेट रिस्टोअर करण्यासाठी ‘एलोन मस्क’ यांच्या स्टारलिंकची मदत घेणे किंवा थेट क्षेपणास्त्र हल्ले करणे, अशा पर्यायांचा समावेश असू शकतो.
Ans: ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणी नेत्यांनी स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना चर्चा करायची आहे.
Ans: अमेरिकेने अलिकडेच व्हेनेझुएलामध्ये केलेली कारवाई आणि ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ल्याची दिलेली धमकी, यामुळे इराणची राजवट धोक्यात आली आहे.
Ans: पेझेश्कियान यांनी जनतेच्या तक्रारी रास्त असल्याचे म्हटले आहे, पण आंदोलनांना हिंसक रूप देण्यामागे अमेरिका आणि इस्रायलचा हात असल्याचा आरोप केला आहे.






