आठ युद्ध थांबल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पची नामुष्की; Russia Ukraine युद्ध थांबवण्यात अपयशी?
पुतिन भारतातून परतताच शांततेसाठी हालचाल; अमेरिका-युक्रेनने रशियासमोर ठेवली नवी अट
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला आठ युद्ध थांबवल्याचा दावा, पण…
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मीच हिरो यावर कायम राहत आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. मात्र ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन युद्ध संपवणे कठीण असल्याचे म्हटले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात विविध चर्चांणा उधाण आले आहे. ट्रम्प यांनी सुरुवातील हे युद्ध थांबवणे सोपे वाटले होते, मात्र आता त्यात अनेक समस्या येत आहेत. अगदी ट्रम्प यांच्या २८ कलमी शांतता योजनेला रशियाने नकार दिला आहे, तर झेलेन्स्कींनी नकार दिला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांना वाटले होते की, त्यांच्या कार्यकाळात सुरुवातीच्या काही महिन्यांमध्येच त्यांनी आठ युद्ध संपवली, यामुळे त्यांनी रशिया आणि युक्रेन युद्ध त्यांच्यामुळेच थांबेल असे गृहित धरले होते. परंतु या संघर्षावर आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांच्या शांतता प्रस्तावावर रशियाने होकार दिला आहे, परंतु युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांना त्यांचे गांभीर्य लक्षात आलेले नाही.
ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी संवाद सुरु असल्याचे म्हटले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, रशिया त्यांच्या प्रस्तावाकडे सकारात्मक दृष्टीकोनातू पाहत आहे, मात्र युक्रेन अजूवही संघर्ष थांबवायला तयार नाही. यामुळे यामध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
#WATCH | US President Donald Trump says, “…I ended eight wars…Russia and Ukraine, I thought it was going to be a little bit easier, but it’s not being made easy…” (Source: The White House) pic.twitter.com/GeV2MN73XC — ANI (@ANI) December 7, 2025
ट्रम्प यांच्या युक्रेन शांतता योजनेमध्ये रशियाच्या हिताच्या अटी आहेत. यामध्ये युक्रेनला त्याचा काही प्रदेश रशियाला सोपवायचा आहे, यामध्ये डोनबास प्रदेशाच्या मुख्यत: समावेश आहे. तसेच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाणार नाही हे देखील या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. युक्रेनच्या मते, ट्रम्प यांचा हा प्रस्ताव त्यांच्या सार्वभौैमत्वाला धोका निर्माण करणार आहे.
याशिवाय ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ (Tarrif) धोरणाचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला आर्थिक दृष्ट्या आणि रनणितीकदृष्ट्या चांगला फायगा झाला आहे. त्यांचे टॅरिफ धोरणा राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांच्या मते, या टॅरिफचा युद्धबंदी करण्यात मोठा उपयोग झाला आहे.






