एर्दोगानने केला पुतिनचा 'डबल गेम'; रशिया युद्धात युक्रेनला पुरवली 'हे' मोठे शस्त्र (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अंकारा: भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान मुस्लिम देश तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दर्शवला आहे. तुर्की इस्लामिक देशांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. तुर्कीचे रशियासोबत संबंध राजनैतिक दृष्टीकोनातून चांगले आहेत. गेल्या अनेक काळापासून तुर्कीने युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला आपला उघड पाठिंबा दर्शवला आहे. परंतु तुर्कीने रशियासोबत दुहेरी खेळ खेळला असल्याचे मानले जात आहे.
एकीकडे अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर निर्बंध लादत आहे, तर दुसरीकडे तुर्कीने रशियाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिका आणि युरोपीय देशांच्या रशियावरील निर्बंधाला विरोध केला आहे. तुर्कीने रशियन नागरिक, पर्यटक आणि स्थलांतरितांसाठी दरवाजे खुले केले आहे. तसेच रशियन कंपन्यांनाही तुर्कीत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. पण पुतिन यांना त्यांच्या एर्दोगानच्या एका कृतीमुळे संताप अनावर झाला आहे.
काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार , तुर्कीने युक्रेनला धोकादायक ड्रोनचा पुरवठा केला आहे. या ड्रोनच्या मदतीने युक्रेनने रशियाचे ४० बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने नष्ट केली आहेत. हे ड्रोन बायरक्तार टीबी-२ आहेत. हे ड्रोन तुर्की बनावटीचे आहे. जगभरात या ड्रोनला त्यांच्या प्राणघातक क्षमतेसाठी ओळखले जाते.
बायरक्तार टीबी-२ हे एक आत्याधुनिक तंत्रज्ञानाचे लढाऊ ड्रोन आहे. हे ड्रोन पाळत ठेवण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठीही वापरले जातात. याची रचना सरळ पंख, मागील बाजूस प्रोपेलर आणि अचूक लक्ष्य ठेवण्याची क्षमता अशी आहे. या ड्रोनचे पहिले उड्डाण २०२४ मध्ये करण्यात आले होते. या ड्रोनच्या ६०० हून अधिक युनिट्स तयार करण्यात आल्या होत्या. २०१९ ते २०२२ पर्यंत युक्रेनला ७२ ड्रोन मिळाले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, तुर्कीने केवळ युक्रेनला मदत करण्यासाठीच नव्हे तर अमेरिका आणि नाटो देशाला खुश करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. तुर्की हा नाटो देशाचा सदस्य आहे. रशियापासून दूर राहण्यासाठी अमेरिकेने अनेकवेळा तुर्कीवर दबाव टाकला आहे.
परंतु एकीकडे तुर्कीने रशियाशी मैत्री असल्याचे दाखवून पुतिन यांच्यासोबत डबल गेम केला आहे. यामुळे रशिया आणि तुर्कीच्या संबंधावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुतिन यांनी तुर्कीच्या एर्दोगानवर संताप व्यक्त केला आहे. याच वेळी तुर्की आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला रशिया-युक्रेनमध्ये मध्यस्थीचा देश म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु रशिया किंवा भारतासाठी तुर्की विश्वासार्ह नाही असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.