चीनमध्ये वादळाचा अलर्ट (फोटो- istockphoto)
चीनमध्ये Typhoon Fengshen वादळाचा अलर्ट
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट मोडवर
चीनमध्ये यंदा 24 वे फेंगशेन वादळ धडकणार आहे. फेंगशेन वादळाचा चीनला अलर्ट देण्यात आला आहे. फेंगशेन वादळाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चीनच्या दक्षिण भागात जोरदार वाऱ्यांसाह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, काल हे वादळ फिलीपीन्समध्ये होते. तेव्हा त्याचा वेग 72 किमी प्रती तास इतका होता.
येत्या काही वेळात वादळाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. व्हिएतनाममध्ये जाईपर्यंत वादळाचा वेग कमी होण्याचा अंदाज आहे. फेंगशेन वादळामुळे पूर्व चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी, दक्षिण चीनमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. याच कालावधीत तैवानमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये फेंगशेन वादळ धडकणार आहे. ताशी 72 किमी प्रतीतास वेगाने वादळ दक्षिण चीनमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. चीनमधील सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे
फिलिपिन्समध्ये फेंगशेन वादळाचा कहर
फिलिपिन्समध्ये बुआलोई वादळ आणि भूकंपानंतर (Earthquake)आता आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. फेंगशेन वादळाने फिलिपिन्समध्ये कहर माजवला आहे. या उष्णकटिबंधीय वादळामुळे फिलिपिन्समध्ये किमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
फिलिपिन्सच्या सरकारी आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सध्या लोकांच्या स्थलांतरचे कार्य सुरु केले आहे. संस्थेने ७ जणांच्या मृत्यूची पुष्ट केली आहे. तसेच फिलिपिन्सच्या मध्य कॅपिझ प्रांततील रोक्सास सिटीमध्ये देखील परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर आणि भूस्खलनाचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव आणि मदक कार्य सुरु केले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुरात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल आहे. तसेच फिलिपिन्सच्या पूर्व क्वेझोन प्रांतात पिटोगोमध्ये एका घरावर झाड कोसळले आहे. यामुळे दोन लहान मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजाराहून अधिक लोक बेघर झाले आहे. वादळ सध्या चीन समुद्रातून व्हिएतनामच्या दिशेने जात आहे. यामुळे व्हिएतनामध्ये देखील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.