अमेरिका G-20 तूनही बाहेर पडणार? ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाने जागतिक राजकारणात गोंधळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकमागून एक असे निर्णय घेत आहेत यामुळे जागतिक राजकारणात उलथापालथ सुरु आहे. पुन्हा एकदा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सामील होणार नसल्याची घोषणा केली आहे. रुबियो यांचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा ट्रम्प प्रशासन आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडत आहे. आता तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिका G-20 परिषदेतूनही बाहेर पडत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.
अमेरिकेची आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार
ट्रम्प प्रशासनाने अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधून माघार घेतली आहे, यामुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. कोविड-19 महामारीच्या काळात WHO अपयशी ठरल्याचा आरोप करत अमेरिका जानेवारी 2025 मध्ये या संस्थेतून बाहेर पडणार आहे. तर पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अमेरिकेने आधीच घेतला होता आणि आता ट्रम्प यांनी पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- विमान अपघातांचे सत्र सुरुच; अमेरिकेतील सिएटलमध्ये दोन विमानांची जोरदार टक्कर, Video Viral
I will NOT attend the G20 summit in Johannesburg.
South Africa is doing very bad things. Expropriating private property. Using G20 to promote “solidarity, equality, & sustainability.” In other words: DEI and climate change.
My job is to advance America’s national interests, not…
— Secretary Marco Rubio (@SecRubio) February 5, 2025
याशिवाय, (UNHRC) संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पक्षपात होत असल्याचा आरोप करत अमेरिका यंदा या मंचावरून बाहेर पडली आहे. तसेच ट्रम्प प्रशासनाने ऑक्टोबर 2017 मध्येच UNESCOमधून माघार घेतली होती, याचे कारण म्हणजे हा संस्थान इस्रायलविरोधी असल्याचा दावा केला गेला होता. आता अमेरिकेने ट्रान्स-पॅसिफिक(TPP) भागीदारीतून देखील पाऊल मागे खेचले आहे. तसेच ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय विकासासाठी मदत करणारी USAID संस्था बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
G-20 मधूनही अमेरिका बाहेर पडणार?
G-20 ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, ट्रम्प प्रशासन बहुपक्षीय संस्थांवर वारंवार प्रश्न उपस्थित करत असून अमेरिकेने आपल्या विदेश मंत्र्यांना G-20 बैठकीला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक स्तरावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत की अमेरिका या मंचावरूनही बाहेर पडेल का?
यामुळे अमेरिका G-20 मधून बाहेर पडल्यास किंवा आपली भूमिका कमी केल्यास, तर चीन आणि इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना जागतिक निर्णयांमध्ये अधिक प्रभावशाली होण्याची संधी मिळेल. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता देखील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण अमेरिका ही G-20 मधील प्रमुख अर्थव्यवस्था आहे.