अमेरिकेने अधिकृतपणे WHO मधून घेतली माघार; जिनिव्हा येथील मुख्यालयावरून अमेरिकेचा ध्वज आला उतरवण्यात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US officially leaves WHO 2026 news : जागतिक राजकारणात आणि आरोग्य क्षेत्रात आज एक अत्यंत मोठा भूकंप झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेने (America) अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) ७८ वर्षांचे जुने नाते तोडले आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र विभागाने काल गुरुवारी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, अमेरिका आता या जागतिक आरोग्य संस्थेचा सदस्य नाही. या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिनिव्हा येथील WHO मुख्यालयाबाहेर डौलाने फडकणारा अमेरिकेचा ‘स्टार्स अँड स्ट्राइप्स’ ध्वज अखेर उतरवण्यात आला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी (२० जानेवारी २०२५) WHO मधून बाहेर पडण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. ट्रम्प प्रशासनाचा असा आरोप आहे की, कोविड-१९ महामारीच्या काळात WHO ने चीनच्या दबावाखाली काम केले आणि जगाला वेळीच सावध करण्यात ही संघटना अपयशी ठरली. ट्रम्प यांच्या मते, संघटनेच्या या अकार्यक्षमतेमुळे अमेरिकेला केवळ जीवितहानीच नाही, तर ट्रिलियन डॉलर्सचे आर्थिक नुकसानही सोसावे लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Security: इराणच्या उंबरठ्यावर 7000 दहशतवादी; खामेनेईंचा फास आवळण्यासाठी अमेरिकेने सीरियाला धरले वेठीशी, पहा कसे?
अमेरिका हा WHO ला सर्वाधिक निधी देणारा देश होता (एकूण बजेटच्या सुमारे १८%). मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने हा सर्व निधी तात्काळ प्रभावाने रोखला आहे. दरम्यान, WHO ने असा दावा केला आहे की अमेरिकेला २०२४ आणि २०२५ या वर्षांचे सुमारे २६० दशलक्ष डॉलर्सचे सदस्यत्व शुल्क देणे बाकी आहे. नियमांनुसार, माघार घेण्यापूर्वी ही थकबाकी भरणे अनिवार्य आहे. परंतु, अमेरिकन परराष्ट्र विभागाने हा दावा फेटाळून लावत म्हटले आहे की, “अमेरिकन जनतेने आधीच या संघटनेला भरमसाठ पैसे दिले आहेत, आता एक रुपयाही दिला जाणार नाही.”
BREAKING: 🇺🇸 U.S. officially exits the WHO today. $260M in owed fees — NOT paid
WHO loses 18% of its funding
25% of staff cut by mid-year Canada needs to do the same. We should make our own health decisions at home. pic.twitter.com/413hJ49wX1 — Marc Nixon (@MarcNixon24) January 22, 2026
credit – social media and Twitter
WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेची माघार हा केवळ त्या देशाचा नाही, तर संपूर्ण जगाचा तोटा आहे.” फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, अमेरिकेच्या बाहेर पडण्यामुळे पोलिओ निर्मूलन, बालआरोग्य आणि नवीन विषाणूंचा शोध घेण्याच्या मोहिमांना मोठा फटका बसू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर
आता अमेरिका कोणत्याही जागतिक मध्यस्थ संस्थेशिवाय थेट इतर देशांशी आरोग्य करारांवर भर देणार आहे. रोग देखरेखीसाठी (Disease Surveillance) अमेरिका स्वतःची स्वतंत्र यंत्रणा राबवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जॉर्जटाउन विद्यापीठाचे तज्ज्ञ लॉरेन्स गोस्टिन यांच्या मते, हे पाऊल कायद्याचे उल्लंघन असले तरी सध्याच्या राजकीय स्थितीत ट्रम्प प्रशासनाला रोखणे कठीण आहे.
Ans: ट्रम्प प्रशासनानुसार, कोविड-१९ महामारी हाताळण्यात WHO अपयशी ठरली आणि ही संघटना राजकीय प्रभावाखाली काम करते, ज्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले.
Ans: अमेरिका हा सर्वात मोठा देणगीदार असल्याने संघटनेला प्रचंड आर्थिक टंचाईचा सामना करावा लागेल आणि जागतिक लसीकरण मोहिमांवर परिणाम होईल.
Ans: अमेरिका आता WHO ऐवजी थेट इतर देशांशी द्विपक्षीय करार करून रोग देखरेख आणि आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहे.






