VIDEO VIRAL : ब्राझीलमध्ये भीषण दुर्घटना; 21 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हॉट एअर बलूनने घेतला पेट, ८ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ब्राझिलिया : ब्राझीलमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका हॉट एअर बलूनला आग लागल्याने ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात ही दुर्घटना घडली. शनिवारी (२१ जून) कॅटरिनामध्ये २१ प्रवाशांना घेऊन हे हॉट एअर बलून निघाले होते. या बलूनने अचानक पेट घेतला आणि खाली कोसळले. यामध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या उड्डाणादरम्यान पर्यटकांच्या हॉट एअर बलुनला आग लागली. त्यानंतर हॉट एअर बलून ब्राझीलच्या प्रेया ग्रांडे शहरात कोसळले. यामध्ये २१ पर्यटक होते. यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखणी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
8 DEAD. And for what? A balloon ride. A selfie. A thrill. 🎈💔
A hot air balloon crashed in Brazil.
It was illegal.
No safety checks. No license. No shame.People boarded it hoping for memories.
They got tragedy.Adventure without responsibility is a crime — not tourism.
Stop… pic.twitter.com/SuEkxcdZRq
— World Wire (@WorldWireX) June 21, 2025
यापूर्वी देखील अशा अनेक हॉट एअर बलूनला आग लागल्याच्या घटना घडल्या आहे. गेल्या रविवारी (१५ जून) देखील ब्राझीलच्या साओ पाऊलो राज्यात एका हॉट एअर बलूनने पेट घेतला होता. यामध्ये २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले होते.
ब्राझीलमध्ये प्रेया ग्रांडे हे हॉट-एअर बलूनिंगसाठी स्थळ आहे. पर्यटकांना येथे हॉट एअर बलूनमध्ये उडण्याचा आनंद घेता येतो. यासाठी दूरवरुन लोक इथे येतात.
सध्या शनिवारी (२१ जून) घडलेल्या या भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु पर्यटकांच्या बेजबाबदार कृत्यामुळे ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अपघातामुळे ब्राझीलच्या सांता कॅटरिना अधिकाऱ्यांचीही चौकशीही सुरु आहे. कोणत्याही सुरक्षातपासणीशिवाय हा उपक्रम राबला जात असल्याने अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.