ब्रिटनची रशियाविरोधात मोठी कारवाई; या तेल कपंन्यांवर लादले निर्बंध, भारतावर होणार परिणाम? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ब्रिटनने रशियाच्या लुकोइल आणि रोझनेफ्टवर निर्बंध लादले आहेत. तर भारताची पेट्रोलियम नारा एनर्जी लिमिटेडवरही निर्बंध लागू केले आहेत. ब्रिटनने म्हटले आहे की, नायरा एनर्जी लिटमिटेडने २०२४ मध्ये रशियाकडून अब्जावधी डॉलर्सचे कच्चे तेल खरेदी केली होते. यामुळे त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने उडाली खळबळ; म्हणाले, ‘PM मोदी…
ब्रिटनच्या मते, रशियाच्या युद्धासाठी निधीच्या स्त्रोतांवर हल्ल केल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) युद्धबंदीस भाग पडतील. रशियाला मिळणार तेल महसूल रोखणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यलय (FCDO) ने दावा केला आहे की, यामुळे रशियाला तेल बाजारातून बाहेर काढण्यास मदत होईल आणि युक्रेनविरुद्ध रशियाला मिळणारा महसूलही रोखला जाईल.
यापूर्वी युरोपियन युनियनने देखील रशियावर निर्बंध लादले होते. यामध्ये नायरा एनर्जी लिमिटेडचा समावेश होता. यावेळी युरोपियन युनियनच्या या निर्बंधांना तीव्र विरोधही करण्यात आला होता. कंपनीने म्हटले होते की, भारतीय कंपनी नायरा आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पूर् पालन करते. कंपनी केवळ देशाच्या उर्जा सुरक्षा आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करते.
ब्रिटनच्या या नव्या निर्बंधामुळे भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतीय पेट्रोलियम कंपीन नायरा एनर्जी लिमिटेडवर निर्बंध लादण्यात आले आहे. यामुळे भारताच्या उर्जा क्षेत्रावर याचा परिणाम होऊ शकतो. रशिया हा भारतासाठी स्वस्त दरात कच्चा तेल पुरवणार देश आहे. पण या निर्बंधामुळे यामध्ये अडथळा येऊ शकतोत यामुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांवर मर्याद येतील.
तसेच परकीय गुंतवणूकीवरही परिणाम होण्याची शक्यात आहे. भारताची उर्जा सुरक्षा मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. पण या निर्बंधामुळे भारताला रशियाला पर्यायी स्रोत शोधावे लागतील. यामुळे अप्रत्यक्षपणे भारतातील इंधन दरांवर परिणाम होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे.
प्रश्न १. ब्रिटनने रशियाच्या कोणत्या तेल कपंन्यांवर लादले निर्बंध?
ब्रिटनने रशियाच्या लुकोइल आणि रोझनेफ्टवर या कच्च्या तेलाच्या किंमतींवर निर्बंध लादले आहे.
प्रश्न २. ब्रिटनच्या रशियावरील निर्बंधामध्ये कोणत्या भारतीय कंपनीचा समावेश आहे?
भारताची पेट्रोलियम नारा एनर्जी लिमिटेडवरही ब्रिटनने रशियाकडून अब्जावधी तेल खरेदीमुळे निर्बंध लागू केले आहेत.
प्रश्न ३. ब्रिनटनाचा रशियावरील निर्बंधाचा हेतू काय आहे?
ब्रिटनच्या रशियाच्या तेल कंपनींवरील नव्या निर्बंधामुळे रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात मिळणार महसूल रोखणे आहे.
Pak-Afghan War : पाकिस्तानी सैन्य पॅन्ट सोडून गेले पळून ; अफगाणी सैन्यानी भरचौकात केला जल्लोष






