US army Parade day: वॉशिग्टन: शनिवारी (१४ जून) अमेरिकेत राष्ट्रांध्यक्षांचा वाढदिवस आणि अमेरिकन सैन्यांच्या स्थापनेचा २५० वा वर्धापन दिन पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीत भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परेडेसाठी आमंत्रिक करण्यात आलेल्या पाहुण्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेने या विक्ट्री परेडसाठी आमंत्रणदिल्याचा दावा केला होता. दरम्यान व्हाईट हाऊसने यासंबंधीत स्पष्टीकरण दिले आहे.
पाकिस्तानी लष्करप्रमुखे असीम मुनीर यांना अमेरिकेकडून आंमत्रण मिळाल्याच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यांना विशेष पाहुणे म्हणून अमेरिकेच्या लष्करी परेडसाठी आमंत्रित करण्यात आल्याचा दावा केला जात होता. हे आमंत्रण भारतासाठी धोकादायक मानले जात होते. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यामुळे भारत आणि अमेरिका संबंधामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता होती.
दरम्यान व्हाईट हाऊसने या दाव्याचे खंडन केले आहे. रविवारी व्हाईट हाऊसने एक अदिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात असीम मुनीर यांच्या अमेरिकेच्या परडेसाठी आमंत्रणाच्या दाव्याचे खंड करण्यात आले. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” अमेरिकेच्या लष्करी परडेमध्ये कोणत्याही परदेशी लष्करी अधिकाऱ्यांला आमंत्रण करण्यात आले नव्हते. हा दावा खोटा आणि लोकांची दिशाभूल करणारा आहे.
व्हाईट हाऊसच्या या स्पष्टीकरणानंतर, भाजपचे जयराम रमेश यांच्यावर खोटेपणा पसरवण्याचा आरोप करण्याच आला आहे. तसेच पंतप्रधान मोदीं यांच्याविरुद्ध द्वेष पसरवण्याचाही आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमेति मालवीय यांनी, रमेश यांनी मिळालेल्या माहितीची खरे खोटे पडताळून न पाहता दिशाभूल करणारी माहिती पसरवली.
अमेरिकेन सैन्याच्या स्थापनेच्या २५० व्या वर्धाप दिनानिमित्तर वॉशिंग्टन डीसीमध्ये एका भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी डोनाल्ड ट्रम्पसह अनेक लष्करी अधिकारी आणि उच्चाधिकारी उपस्थित होते. या परडेमध्ये ६,००० हून अधिक अमेरिकन सैनिक, १५० हून अधिक चिलखती लष्करी वाहने, ५० हून अधिक लढाऊ विमाने सहभागी झाली होती. तसेच यासाठी ३५० कोटींचा खर्च करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर देशांतर्गत मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.