Hijab: जगाचे लक्ष इराणकडे! मॅरेथॉनमधील 'या' धक्कादायक घटनेमुळे महिलांच्या हक्कांवरील वाद पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर, Photo Viral ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Iran Marathon Controversy : इराणच्या (Iran) रूढीवादी इस्लामिक शासनामध्ये हिजाब घालण्यावरून (Compulsory Hijab) पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाला आहे. यावेळी, ‘आवाज’ उठवण्यासाठी कोणतेही आंदोलन किंवा जाहीर प्रदर्शन झाले नाही, तर एका खेळाच्या मैदानावर हा वाद सुरू झाला आहे. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरील लोकप्रिय किश बेटावर आयोजित केलेल्या एका मॅरेथॉनमध्ये महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे हा वाद पेटला आहे.
या मॅरेथॉनमध्ये सुमारे २००० महिला आणि ३००० पुरुषांनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या अनेक महिला सहभागी हिजाब किंवा स्कार्फशिवाय (Without Hijab or Scarf) धावताना दिसल्या. त्यांचे लाल टी-शर्ट परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि या घटनेमुळे इराणमध्ये धार्मिक कट्टरपंथी गटांसह अनेकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महिलांनी हिजाबशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे फोटो व्हायरल होताच, इराण सरकारने कठोर भूमिका घेतली. न्यायव्यवस्थेने तात्काळ निवेदन जारी करत या कार्यक्रमाच्या दोन आयोजकांना अटक केली. किशच्या सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमामुळे देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक सीमांना आव्हान देण्यात आले आहे. “हा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने आयोजित करण्यात आला होता आणि सार्वजनिक शिष्टाचाराचे (Public Decorum) उल्लंघन केले गेले,” असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारच्या मते, महिलांनी केलेले हे कृत्य धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे उल्लंघन करणारे आहे, आणि असे उल्लंघन सहन केले जाणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MBS : रियाधमध्ये दारूच्या दुकानांसमोर रांगा; क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रुढीवादी सौदी अरेबियाची ‘ती’ भिंत पाडली
इराणमध्ये हिजाबचा मुद्दा अनेक वर्षांपासून अत्यंत संवेदनशील आहे. २०२२ मध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा ‘ड्रेस कोडचे उल्लंघन’ केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला होता. महसाच्या मृत्यूनंतर देशभरात ‘महिला, जीवन, स्वातंत्र्य’ (Woman, Life, Freedom) या घोषणेखाली व्यापक निदर्शने झाली, ज्यामुळे समान हक्क आणि महिला स्वातंत्र्याची मागणी अधिक तीव्र झाली.
Iran’s Athletics Federation tried to stop the marathon because women refused to wear hijab, and failed.
5,000 runners on Kish Island said “No” to forced veiling.
To Western media: this isn’t reform.
Khamenei just ordered a harsher crackdown, yet women keep resisting.
As one woman… pic.twitter.com/2cN531edrg — Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) December 5, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Musk यांच्या कंपनीवर EU चा 12,000 कोटींचा ऐतिहासिक दंड; ‘BlueTick’मुळे अमेरिका आणि युरोप कसे आले आमनेसामने?
मॅरेथॉनमधील ही घटना महिला स्वातंत्र्याच्या संघर्षातील एक नवीन आणि धाडसी पाऊल मानली जात आहे. हिजाबला विरोध करणारे आणि महिला स्वातंत्र्याचे समर्थन करणारे कार्यकर्ते या महिलांच्या कृतीचे कौतुक करत आहेत. त्यांचा युक्तिवाद आहे की, खेळासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांच्या सहभागावर धार्मिक निर्बंध लादणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे आणि महिलांना त्यांच्या आवडीनुसार पेहराव करण्याची मुभा मिळायला हवी. एकंदरीत, इराण सरकार आणि महिलांच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या नागरिकांमध्ये हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे, आणि मॅरेथॉनची ही घटना या संघर्षाला एक नवीन आयाम देत आहे.
Ans: इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरील किश बेटावर (Kish Island).
Ans: मॅरेथॉनचे दोन आयोजक (Organizers) यांना अटक केली.
Ans: २०२२ मध्ये महसा अमिनी हिच्या पोलिस कोठडीतील मृत्यूनंतर.






