Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरिक्षण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh Eelection : ढाका : सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्याचे अंतरिम सरकार आणि मीज पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षामध्ये वाद सुरु आहे. येत्या सार्वत्रिक निवडणूकांवरुन हा वाद रंगला आहे. बांगलादेशमध्ये (Bangladesh) फ्रेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे. याच वेळी ब्रिटनने बांगलदेशाला मदतीची घोषणा केली आहे.
ब्रिटन आणि युरोपियन यूनियन (EU) या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील निवडणूका पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी युरोपियन यूनियन यासाठी १५० निवडणूक निरीक्षक पाठवणार आहे. या संदर्भात युरोपियन युनियनने बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालय व निवडणूक आयोगाला त्रिपक्षीय करारचा (MOU) प्रस्ताव पाठवला आहे.
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी
बांगलादेशच्या निवडणूक आयोगाचे वरिष्ठ सचिव अख्तर अहमद यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, युरोपियन युनियनचे प्रतिनिधी मंडळाने बांगलादेश आयोगाला भेट दिली आहे. यासाठी EU मतदान केंद्रामध्ये निरीक्षण करणार आहे. निकाल जाहीर करण्याची पद्धत, गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्धी या सर्वांची तपासणी केली जाणार आहे. याची माहिती बांगलादेश आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. सर्व निवडणूक परीक्षक निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बांगलादेशात निरिक्षणासाठी दाखल होणार आहेत.
बांगलादेशच्या निवडणूक प्रक्रियेत ब्रिटनही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ढाकातील ब्रिटनच्या उच्चायुक्त सारा कुक यांनी मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नसीर उद्दीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ब्रिटनच्या सहकार्याबाबत चर्चा झाली. ब्रिटनने देखील बांगलादेशातील निवडणूका पारदर्शकतेने पार पडाव्यात यासाठी मदतीची ऑफर दिली.
ब्रिटनचे एक प्रतिनिधी मंडळ यासाठी बांगलादेशला प्रशिक्षण देणार आहे. याशिवाय ब्रिटन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रीय नागरी शिक्षण कार्यक्रम व निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहेत.
युरोप आणि ब्रिटनकडून बांगलादेशला मिळणारे सहकार्य महत्त्वाचे मानले जात आहे. कारण गेल्या काही वर्षात बांगलादेशमधील परिस्थिती पाहता त्यांच्या निवडणुकांबाबत निष्पक्षतेवर प्रश्न उभे राहिले आहेत. बांगलादेशातील निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे संपूर्म जगाचे लक्ष याकडे लागलेले आहे.
प्रश्न १. बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका कधी होणार आहेत?
बांगलादेशात फ्रेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.
प्रश्न २. युरोपियन युनियन बांगलादेशात किती निवडणूक निरीक्षक पाठवणार आहेत?
युरोपियन युनियन बांगलादेशात १५० निवडणूक निरीक्षक पाठवणार आहेत.
प्रश्न ३. ब्रिटन बांगलादेशला निवडणूकींमध्ये कसे सहकार्य करणार आहे?
ब्रिटन बांगलादेशला पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूकां घेण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी ब्रिटनचे एक प्रतिनिधी मंडळ बांगलादेशमध्ये नागरी शिक्षण कार्यक्रम व निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहेत.
‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप