आता युद्ध अटळ? NATO-EU नेत्यांसोबत बैठकीनंतर झेलेन्स्कींनी रशियाला दिला 'हा' स्पष्ट संदेश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नाटो आणि युरोपियन देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी युक्रेनची जमिनी कोणत्या परिस्थितीत रशियाला देणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांना दिला आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रस्तावित शांतता योजनेले स्पष्टपणे नकार दिला आहे. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया युक्रेन संघर्ष सुरु आहे. हे थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक राजनैतिक प्रयत्न केले जात आहे. परंतु हे युद्ध अधिक भयंकर होत चालले आहे. अशातच ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी शांतता योजना आखली होती. याला रशियाने सहमती दर्शवली होती, परंतु युक्रेनने कोणतेही उत्तर दिले नव्हते. या योजनेतील सर्व अटी या रशियाच्या हिताच्या होत्या.
दरम्यान लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चांसरल फ्रेडरिक मर्झ यां नेत्यांसोबत झेलेन्स्कींची बैठक पार पडती. या बैठकीत सर्व नेत्यांनी ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांचे स्वागत केले, परंतु त्यांच्या योजनेला नकार दिला. ट्रम्प यांच्या योजनेमुळे युक्रेनची राष्ट्रीय सुरक्षितता आणि सार्वभौमत्व धोक्यात येईल असे नेत्यांनी म्हटले. दरम्यान या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा शांतता प्रस्तावर अस्वीकार केला आहे. युक्रेन कोणत्याही स्वरुपात आला देशाचा एकही इंच रशियाला देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. शांततेच्या बदलात रशिया युक्रेनवर अमेरिकेच्या मदतीने दबाव आणत आहे, पण आम्ही या दबावाला बळी पडणार नाही असे झेलेन्स्कींनी म्हटले.
ट्रम्प यांच्या युक्रेन शांतता योजनेमध्ये रशियाच्या हिताच्या अटी आहेत. यामध्ये युक्रेनला त्याचा काही प्रदेश रशियाला सोपवायचा आहे, यामध्ये डोनबास प्रदेशाच्या मुख्यत: समावेश आहे. तसेच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाणार नाही हे देखील या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. युक्रेनच्या मते, ट्रम्प यांचा हा प्रस्ताव त्यांच्या सार्वभौैमत्वाला धोका निर्माण करणार आहे.
आठ युद्ध थांबल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पची नामुष्की; Russia Ukraine युद्ध थांबवण्यात अपयशी?
Ans: नाटो आणि युरोपियन देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी युक्रेनची जमिनी कोणत्या परिस्थितीत रशियाला दिली जाणार नाही असा स्पष्ट आणि कडक संदेश झेलेन्स्कींनी दिला आहे.
Ans: गेल्या चार वर्षापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे.






