हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर 
ऑटोमोबाइल

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर

Kia Sorento India: Kia Sorento भारतात 4 सप्टेंबर 2026 रोजी लॉन्च होणार असून त्याआधीच या प्रीमियम 3-रो SUV ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्याचे V3Cars ने डीलर सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. अनंतपूर प्रकल्पात Sorento चे उत्पादन सुरू झाले आहे.

श्वेता झगडे
  • लॉन्चपूर्वीच Kia Sorento ची सेफ्टीत बाजी!
  • Bharat NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग
  • Fortuner ला देणार टक्कर
  • 4 सप्टेंबरला भारतात येणार Kia Sorento

Kia Sorento India: भारतीय SUV बाजारात आणखी एका प्रीमियम गाडीची दमदार एंट्री होणार आहे. Kia प्रीमियम 3-रो SUV ‘Sorento’ भारतात 4 सप्टेंबर 2026 रोजी लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वीच या SUV च्या सुरक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. V3Cars ने डीलरच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतासाठी तयार करण्यात आलेल्या Kia Sorento ने Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. मात्र Adult Occupant Protection आणि Child Occupant Protection चे स्वतंत्र गुण अद्याप जाहीर झालेले नाहीत.

भारतात उत्पादन सुरू

Kia ने आंध्र प्रदेशातील अनंतपूर उत्पादन प्रकल्पात भारतासाठीच्या Sorento चे उत्पादन सुरू केले आहे. पहिली स्थानिक पातळीवर उत्पादित Sorento उत्पादन लाइनमधून बाहेर आली आहे. या प्रीमियम SUV साठी प्री-बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. Sorento ही Kia च्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये Seltos च्या वर स्थान मिळवणार असून कंपनीची भारतातील प्रमुख नॉन-इलेक्ट्रिक SUV ठरणार आहे.

दोन पॉवरट्रेन पर्यायांची चर्चा

Sorento मध्ये हायब्रिड आणि डिझेल असे दोन पॉवरट्रेन पर्याय असणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, 1.6-लिटर टर्बो-पेट्रोल स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन सुमारे 238PS पॉवर आणि 380Nm टॉर्क निर्माण करण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे 2.2-लिटर टर्बो-डिझेल इंजिन सुमारे 202PS पॉवर आणि 442Nm टॉर्क देण्याची अपेक्षा आहे. हायब्रिड व्हर्जनमध्ये 4WD/AWD मिळणार असल्याचे समोर आले आहे. डिझेलच्या काही व्हेरिएंटमध्येही AWD पर्याय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सेफ्टीमध्ये काय मिळणार?

Bharat NCAP मध्ये Sorento ला 5-स्टार रेटिंग मिळाल्याचे वृत्त असले तरी संपूर्ण क्रॅश टेस्ट स्कोअर अद्याप उपलब्ध झालेला नाही. कंपनीकडून किंवा Bharat NCAP कडून अधिकृत सविस्तर निकाल समोर आल्यानंतर Adult आणि Child Occupant Protection मधील कामगिरी अधिक स्पष्ट होईल. Sorento मध्ये Level-2 ADAS, मल्टिपल एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि Electronic Stability Control सारखी आधुनिक सुरक्षा उपकरणे अपेक्षित आहेत.

केबिनही असणार प्रीमियम

Sorento च्या केबिनमध्ये ड्युअल 12.3-इंच डिस्प्ले, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि Head-Up Display सारखी प्रीमियम फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. ती 3-रो SUV असल्यामुळे मोठ्या कुटुंबासाठी प्रीमियम आणि प्रशस्त पर्याय म्हणून Kia ही कार भारतीय बाजारात सादर करणार आहे.

Fortuner शी होणार स्पर्धा?

भारतात लॉन्च झाल्यानंतर Kia Sorento ची स्पर्धा Toyota Fortuner, Jeep Meridian आणि इतर प्रीमियम 3-रो SUV सोबत होण्याची शक्यता आहे. मात्र Sorento चे मोनोकॉक प्लॅटफॉर्म आणि हायब्रिड पॉवरट्रेन यामुळे तिचे स्वरूप Fortuner सारख्या पारंपरिक बॉडी-ऑन-फ्रेम SUV पेक्षा वेगळे असेल. हायब्रिड आणि डिझेल असे दोन्ही पर्याय देण्याचा निर्णय Sorento साठी महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः हायब्रिडसोबत 4WD मिळणार असल्याने प्रीमियम SUV ग्राहकांसाठी हा वेगळा पर्याय ठरू शकतो.

किंमत किती असणार?

Kia ने Sorento ची अधिकृत भारतीय किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. विविध माध्यमांमध्ये किंमतीबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत असल्यामुळे 28 ते 30 लाख रुपयांच्या किंमतीचा दावा सध्या निश्चित मानता येणार नाही. Sorento ची अधिकृत किंमत, व्हेरिएंट आणि संपूर्ण India-spec फीचर्स लॉन्चच्या वेळी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. 4 सप्टेंबरला Sorento भारतीय बाजारात दाखल झाल्यानंतर तिची किंमत हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरणार आहे. 5-स्टार सेफ्टी रेटिंगचे वृत्त, हायब्रिड तंत्रज्ञान, डिझेलचा पर्याय आणि 4WD यामुळे मात्र लॉन्चपूर्वीच या SUV बाबत उत्सुकता वाढली आहे.

Latur : 'आरबीआयच्या पत्राचा नीट अभ्यास करा!' धीरज देशमुखांचा निलंगेकरांना सल्ला

Relationship tips: नात्यात पर्सनल स्पेस असणे का महत्त्वाचे आहे? प्रेम टिकवण्यासाठी एकमेकांना द्या थोडा वेळ

Delimitation Bill 2026: लोकसभेतील १६ पक्ष ठरणार गेमचेंजर! परिसीमन विधेयकासाठी NDA चे बहुमताचे गणित कसे जुळणार?

Emraan Hashmi Viral Video: जिनिलियाच्या कानातल्यांसोबत इम्रानने केलं असं काही... रितेश देशमुखचा चेहरा पाहण्यासारखा

Kabaddi Tournament : निवारा हिड इंडिया महिलांच्या उपउपांत्य फेरीत; पुरुषांत चार संघांची आगेकूच