(फोटो सौजन्य-AI एआय) 
ऑटोमोबाइल

KTM 390 Adventure आता नव्या ग्राफिक्ससह शोरूममध्ये दाखल! इंजिन आणि फीचर्समध्ये काय आहे खास?

केटीएमच्या लोकप्रिय अ‍ॅडव्हेंचर बायकने नव्या रूपात शोरूममध्ये हजेरी लावली असून तिच्या डिझाईन आणि ग्राफिक्समध्ये अत्यंत आकर्षक बदल करण्यात आले आहेत.

Atharva Rajopadhye
  • केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर नव्या आणि सोबर सोबर राखाडी-पांढऱ्या ग्राफिक्ससह शोरूममध्ये दाखल झाली आहे.

  • इंजिन, फीचर्स आणि ६-स्पीड गिअरबॉक्सच्या मेकॅनिकल सेटअपमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही.

  • सुमारे २.८२ लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत ही बाईक आधुनिक इलेक्ट्रॉनिक फीचर्ससह उपलब्ध आहे.

KTM 390 Adventure New Model: KTM कंपनीने आपल्या लोकप्रिय 'KTM 390 अ‍ॅडव्हेंचर' या मोटरसायकलला एक छोटासा व्हिज्युअल अपडेट दिला आहे. ही नवीन बाईक आता फ्रेश आणि इंटरेस्टिंग ग्राफिक्ससह शोरूम्समध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.KTM च्या या अपडेटेड वर्जनशी जवळून ओळख करून घेऊयात,

ग्राफिक्स आणि डिझाइनमध्ये काय बदलले आहे?

कंपनीने बाईकच्या यांत्रिक रचनेत कोणताही बदल केलेला नाही, पण तिचे डिझाइन आधीपेक्षा अधिक आकर्षक केले आहे,

  • नवीन रंग व लूक: ही बाईक 'सेरॅमिक व्हाईट' या रंगात येते. आधीच्या मॉडेलवर मोठे 'KTM' नाव आणि नारंगी बॅकग्राउंड होते.
  • बदललेले ग्राफिक्स: नव्या व्हर्जनमध्ये ग्राफिक्ससाठी राखाडी रंगाचा बॅकग्राउंड वापरला आहे.
  • ब्रँडिंगमधील बदल: 'KTM' चे नाव आता थोडे छोटे करून वरच्या बाजूला हलवण्यात आले आहे. तसेच '390' या अक्षरांसोबत आता 'ADVENTURE' हा प्रीफिक्स जोडण्यात आला आहे. यामुळे बाईकचा एकूण लूक अधिक सोबर आणि प्रीमियम दिसतो.

प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

इंजिन आणि परफॉर्मन्स: बाईकमध्ये ३४९.३२ cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर DOHC इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन 41.5 PS ची पॉवर आणि 33.5 Nm चा टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड गिअरबॉक्स, स्लिपर क्लच आणि बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर मिळतो.

  • टायर्स आणि डिझाइन: यात पुढच्या बाजूला १९-इंचाचे आणि मागच्या बाजूला १७-इंचाचे अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे महामार्गावरील प्रवासासाठी उत्तम आहेत.
  • आधुनिक फीचर्स: बाईकमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक रायडर एड्स यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत आणि उपलब्ध पर्याय

GST च्या नियमांनुसार कर कमी राहावा आणि किंमत आवाक्यात राहावी म्हणून कंपनीने यात ३४९ cc चे इंजिन वापरले असले तरी नाव मात्र '390' असेच ठेवले आहे. सध्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत जवळपास ₹ २.८२ लाख आहे.

ऑफ-रोडिंगची आवड असणाऱ्यांसाठी या मॉडेलव्यतिरिक्त KTM 390 Adventure R हा पर्यायही उपलब्ध आहे, ज्यामध्ये स्पोक व्हील्स आणि जास्त ट्रॅव्हल असलेले सस्पेंशन मिळतात.

Asia Cup rising Stars : सोन्याच्या लंकेतील दुष्काळ संपला, श्रीलंका नवी 'रायझिंग स्टार्स'; गतविजेत्या पाकड्यांची रडू'निती' चालली नाही

ह्युंदाईची भारतासाठी पहिली MPV येणार; टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला मिळणार नवी स्पर्धा

फोक्सवॅगनच्या इम्पोर्ट प्रोसेसवर केंद्र सरकारचा आक्षेप; 10,500 कोटींच्या करप्रकरणात मर्सिडीज, BMW चाही उल्लेख

World News : ट्रम्प यांच्या ‘जगातील सर्वात खास मेजवानी’त सेलिब्रिटींची मांदियाळी;अनेक दिग्गजांची उपस्थिती

Maharashtra Politics : शरद पवार एका दिवसात वाईट कसे झाले? चंद्रकांत पाटलांचा सवाल; संजय राऊतांवरही निशाणा