Royal Enfield Electric Motorcycle Investment Plans  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक वाहनांसाठी 1,000 कोटींची गुंतवणूक; 500 जणांना रोजगाराची संधी मिळणार

रॉयल एनफिल्ड तमिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक वाहन व्यवसायासाठी पुढील 7 वर्षांत 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवीन इलेक्ट्रिक मोटारसायकल्स आणि टेक्नोलॉजीच्या विकासासोबतच या प्रकल्पातून 500 रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. कंपनी फ्लाइंग फ्ली ब्रँडचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

Atharva Rajopadhye
  • रॉयल एनफिल्ड तमिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक वाहन व्यवसायासाठी 1,000 कोटींची गुंतवणूक करणार

  • नवीन इलेक्ट्रिक मोटारसायकल्सच्या विकासातून 500 रोजगार निर्माण होण्याची शक्यता

  • फ्लाइंग फ्ली FF.C6 ची किंमत 2.79 लाख रुपये, रेंज 154 किमी

ईलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी रॉयल एनफिल्डने मोठी तयारी सुरू केली आहे. कंपनी तमिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक वाहन व्यवसायासाठी पुढील 7 वर्षांत 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून नवीन इलेक्ट्रिक मोटारसायकल्स, त्यांच्याशी संबंधित टेक्नोलॉजी आणि प्रोडक्शन सुविधांच्या विकासावर भर दिला जाणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात सुमारे 500 रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

25 नोव्हेंबर 2026 रोजी चेन्नई येथे तमिळनाडू सरकार आणि रॉयल एनफिल्ड यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार बंधनकारक नसून कंपनीच्या प्रस्तावित गुंतवणुकीचा आराखडा त्यातून समोर आला आहे. नवीन इलेक्ट्रिक मोटारसायकल्सची रचना, विकास आणि त्यासाठी आवश्यक टेक्नोलॉजी तयार करण्यासाठी हा निधी वापरला जाईल. गरजेनुसार उत्पादन सुविधांमध्येही गुंतवणूक केली जाणार आहे.

रॉयल एनफिल्डने इलेक्ट्रिक वाहनांसाठी वल्लम वडागल येथे स्वतंत्र सुविधा उभारली आहे. याच ठिकाणी कंपनीची फ्लाइंग फ्ली इलेक्ट्रिक मोटारसायकलसाठी संशोधन प्रयोगशाळाही कार्यरत आहे. कंपनीने याच वर्षी फ्लाइंग फ्ली ब्रँडअंतर्गत आपली पहिली इलेक्ट्रिक मोटारसायकल विक्रीसाठी आणली आहे. त्यामुळे नव्या गुंतवणुकीतून या ब्रँडचा विस्तार आणि नवीन मॉडेल्सच्या विकासाला गती मिळू शकते.

विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच पारंपरिक मोटारसायकल प्रोडक्शन वाढवण्यावरही कंपनीचा भर आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये रॉयल एनफिल्डने चेय्यार येथील कारखान्याच्या विस्तारासाठी 958 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती. हा विस्तार पूर्ण झाल्यानंतर कंपनीची वार्षिक उत्पादन कॅपसिटी 20 लाख मोटारसायकल्सपर्यंत पोहोचणार आहे.

दरम्यान, फ्लाइंग फ्ली FF.C6 इलेक्ट्रिक मोटारसायकलची भारतातील एक्स-शोरूम किंमत 2.79 लाख रुपये आहे. यात 15.4 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असून 60 Nm टॉर्क मिळतो. 3.91 kWh बॅटरीमुळे 154 किमी IDC रेंज आणि 115 किमी प्रतितास कमाल वेग मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. बॅटरी सबस्क्रिप्शन योजनेत सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये होते.

फ्लाइंग फ्लीची विक्री आणि सर्व्हिस नेटवर्कही विस्तारत आहे. गोवा हे या मोटारसायकलसाठी भारतातील सहावे मार्केट ठरले असून अर्पोरा, पणजी आणि मडगाव येथे सुविधा सुरू आहेत. यापूर्वी बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि कोची येथे ती उपलब्ध झाली होती. भारताबाहेर युरोप आणि ब्रिटनमध्येही तिची विक्री सुरू आहे. या नव्या गुंतवणुकीमुळे रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक वाहन प्रवासाला पुढील काही वर्षांत नवी दिशा मिळू शकते.

Cricket News: मैदानावर जय बिस्ताचा धुमाकूळ; 77 रन्स अन्...; 'या' संघाचा दणदणीत पराभव

Dombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव

आधार लिंक नाही, ई-केवायसी अपूर्ण; मावळमधील शेकडो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

Jawa Yezdi BSA Nomads Community : पिढ्यान्‌पिढ्या टिकलेली बाईकची क्रेझ! जावा, येझदी आणि BSA नोमॅड्स कम्युनिटीने गाठला 3 लाखांचा टप्पा

IND vs NZ: किवींच्या मैदानावर टीम इंडियाची अग्निपरीक्षा! हॅगली ओव्हलची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report